For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कहां शुरु कहां खतम’चा ट्रेलर सादर

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘कहां शुरु कहां खतम’चा ट्रेलर सादर
Advertisement

ध्वनि भानुशाली मुख्य भूमिकेत

Advertisement

गायिका ध्वनि भानुशाली गायनात स्वत:चे कौशल्य यापूर्वीच सिद्ध करून आहे, आता ध्वनि बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज आहे. ‘कहां शुरु कहां खतम’ चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. कॉमेडीचा भरपूर डोस असलेल्या या चित्रपटाची कहाणी एका विवाहाभोवती घुटमळणारी आहे. चित्रपटात ध्वनिसोब आशिम गुलाटी  मुख्य भूमिकेत आहे. याचे दिग्दर्शन सौरभ दासगुप्ता यांनी केले आहे. विवाहाच्या कहाणीवर आधारित ट्रेलरमध्ये ध्वनिला मंडपातून पळून जाणारी वधू आणि आशिम गुलाटीला विवाह मोडू पाहणाऱ्या युवकाच्या स्वरुपात दाखविण्यात आले आहे.

विवाहापासून वाचणे सोपे आहे, परंतु प्रेमापासून वाचणार कसे अशी कॅप्शन देत ध्वनिने या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. 20 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ध्वनि स्वत:च्या पदार्पणासाठी अत्यंत उत्सुक आहे. या चित्रपटात ध्वनि आणि आशिमसोबत सुप्रिया पिळगावकर, राकेश बेदी, सोनाली सचदेव, राजेश शर्मा, अखिलेंद्र मिश्रा, चितरंजन त्रिपाठी, विक्रम कोचर, हिमांशु कोहली आणि विकास वर्मा हे कलाकार दिसून येतील. या चित्रपटाची निर्मिती भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि कठपुतली क्रिएशन्स प्रॉडक्शन्सकडून करण्यात आलवी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.