For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ह्युमरसली योर्स सीझन 3’चा ट्रेलर जारी

06:57 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘ह्युमरसली योर्स सीझन 3’चा ट्रेलर जारी
Advertisement

विपुल गोयल यांची कॉमेडी सीरिज

Advertisement

झी5 ओरिजिनिल सीरिजचा तिसरा सीझन आणि टीव्हीएफ क्रिएशनच्या ‘ह्यूमरसली योर्स’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. 2016 मध्ये स्वत:च्या यशस्वी प्रारंभानंतर निर्मात्यांनी 2019 मध्ये दुसरा सीझन सादर केला होता. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर याचा तिसरा सीझन सादर केला जाणार आहे. ह्युमरसली योर्स सीरिज कॉमेडी ड्रामा असून ती स्टँडअप कॉमेडियन विपुल गोयल याच्या खऱ्याखुऱ्या अनुभवांवर आधारित आहे. एक सुंदर आणि सहाय्यक पत्नी काव्या, प्रामाणिक मित्र आणि विश्वासपात्र भुशी तसेच मॅनेजर लांबासोबत हा शो खळखळून हसविणारा आहे. अनुभव सिंह बस्सी, जॉनी लिवर, हर्ष गुजराल आणि इतर कॅमियोंसोबत या सीझनमध्ये प्रेक्षकांना बरेच काही पहायला मिळणार आहे.

पुन्हा एकदा काव्याची भूमिका साकारणे अत्यंत मजेशीर होते. ह्युमरसली योर्स यासारख्या शोमध्ये काव्याची व्यक्तिरेखा साकारणे एक आनंददायी प्रवास होता. विपुल एक सुपर स्टँडअप कॉमिक ओ. त्याच्या अनेक व्हिडिओंनी मला लॉकडाउनच्या काळात हसविले होते. त्याच्यासोबत काम करणे नेहमीच मजेशीर असते असे रसिका दुग्गलने म्हटले आहे.

Advertisement

ह्युमरसली योर्ससोबत माझा प्रवास 2016 मध्ये सुरू झाला आणि 7 वर्षांनी आम्ही सीझन 3 सोबत परतत आहोत. या सीझनमध्ये काही उत्तम हास्य कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली असल्याचे उद्गार अभिषेक बॅनर्जीने काढले आहेत. ह्युमरसली योर्सचा तिसरा सीझन 22 डिसेंबर रोजी झी5 वर प्रदर्शित झाला आहे.

Advertisement
Tags :

.