कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ब्लॅक व्हाइट अँड ग्रे-लव किल्स’चा ट्रेलर सादर

06:30 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तिग्मांशू धुलिया शोमध्ये दिसून येणार

Advertisement

सोनी लिवचा नवा डॉक्यू-ड्रामा ‘ब्लॅक, व्हाइट अँड ग्रे-लव किल्स’चा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा शो 2 मे रोजी सोनी लिववर प्रदर्शित केला जाणार आहे. यात एक पत्रकार डॅनियल गॅरी यांची कहाणी असून तो हत्यांचे रहस्य उकल करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान तो भ्रष्टाचार आणि सामाजिक असमानता यासारख्या मुद्द्यांना प्रकाशात आणतो.

Advertisement

अभिनेता मयूर मोरे या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात खास अनुभव राहिला. ही कहाणी प्रेक्षकांना गुन्ह्यांच्या जगतात नेते आणि मोठ्या प्रश्नांविषयी विचार करण्यास भाग पाडते. कमी पर्याय अन् अवघड आयुष्य असलेल्या व्यक्तीची भूमिका मी साकारत आहे. प्रेक्षक याला पसंत करतील आणि कहाणीवर विचार करतील अशी अपेक्षा असल्याचे मयूर मोरेने म्हटले आहे.

या शोचे दिग्दर्शन पुष्कर सुनील महाबलम यांनी केले आहे. तर यात तिग्मांशू धूलिया, मयूर मोरे, पलक जायसवाल, देवेन भोजानी, एडवर्ड सोनेंब्लिक, हकीम शाहजहां, अनंत जोग, कमलेश सावंत हे कलाकार यात दिसून येतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article