अवनीतच्या ‘लव इन व्हिएतनाम’चा ट्रेलर सादर
‘लव्ह इन व्हिएतनाम’ चित्रपटात प्रेमाची कहाणी देशाच्या सीमा ओलांडून एका सुंदर जगताची भेट प्रेक्षकांशी घडवून आणणार आहे. या चित्रपटात अवनीत कौर, शांतनु महेश्वरी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात व्हिएतनामी अभिनेत्री खा नागन देखील दिसून येईल. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात पंजाबपासून सुरू होत कहाणी व्हिएतनामपर्यंत पोहोचते. एक युवक (शांतनू) आणि युवती (अवनीत) बालपणापासून परस्परांना ओळखत असतात. युवतीची इच्छा या युवकाची पत्नी होण्याची असते. परंतु युवकाचे पिता त्याला व्हिएतनाममध्ये पाठवितात. तेथे युवक व्हिएतनामी युवतीच्या (खा नागन) प्रेमात पडतो. यामुळे पंजाबमधील युवतीचा प्रेमभंग होतो. चित्रपटात अवनीत कौर, शांतनु महेश्वरी, व्हिएतनामी अभिनेत्री खा नागनसोबत फरीदा जलाल, गुलशन ग्रोवर, राज बब्बर हे कलाकार दिसून येणार आहेत. चित्रपटात पंजाब आणि व्हिएतनाम येथील सुंदर दृश्य दिसून येतील. राहत शाह काजमी यांच्याकडून दिग्दर्शित हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.