For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘अन्नपूर्णानी’चा ट्रेलर प्रदर्शित

06:04 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘अन्नपूर्णानी’चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

नयनतारा मुख्य भूमिकेत

Advertisement

जवान या चित्रपटात शाहरुख खानसोब दिसून आल्यावर नयनतारा आता स्वत:चा आगामी चित्रपट ‘अन्नपूर्णानी-द गॉडेस ऑफ फूड’वरून चर्चेत आहे. नयनताराने पुन्हा एकदा नव्या चित्रपटासोबत प्रेक्षकांची मने जिंकण्यास तयार आहे. या चित्रपटात ती एका महत्त्वाकांक्षी शेफची भूमिका साकारत आहे. चित्रपट निर्मात्यांनी आता याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

ट्रेलरमध्ये नयनताराची व्यक्तिरेखा दाखविण्यात आली आहे, जी आईवडिलांच्या आक्षेपानंतरही शेफ होण्याची इच्छा बाळगते. एमबीए करण्याच्या नावाखाली एका कुकिंग स्कुलमध्ये प्रवेश तिने घेतलेला असतो. मांसाहारी भोजनाचे सेवन केल्यावर युवतीचा आत्मविश्वास डळमळीत होत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. यानंतर निडर होत ती भारताचा सर्वश्रेष्ठ शेफ होण्यासाठीच्या स्पर्धेत सहभागी होते. ट्रेलरमध्ये स्वत:च्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या प्रवासात येणाऱ्या आव्हानांची एक झलक दिसून येते. हा नयनताराचा 75 वा चित्रपट असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे. नीलेश कृष्णा यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा पुन्हा एकदा अभिनय जयसोबत काम करत आहे. यापूर्वी ती एटलीच्या 2013 मध्ये प्रदर्शित ‘राजा रानी’ चित्रपटात दिसून आली होती. अन्नपूर्णानी चित्रपटात नयनतारा, जयसोबत रेडिन किंग्सले, सत्यराज, कार्तिक कुमार दिसून येणार आहेत. नयनतारा पुढील काळात टेस्ट, डियर स्टुडंट्स, विकी 6, कन्नप्पा, मन्नानगट्टी: सिन्स 1690 या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.