For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एमी जॅक्सन विवाहबंधनात

07:00 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमी जॅक्सन विवाहबंधनात
Advertisement

प्रियकर एड वेस्टविकसोबत विवाहबद्ध

Advertisement

अभिनेत्री एमी जॅक्सनने इटलीत स्वत:च्या प्रियकरासोबत विवाह केला असून या सोहळ्याची छायाचित्रे तिने शेअर केली आहेत. एमीने ब्रिटिश अभिनेता एड वेस्टविकसोबत विवाह केला असून या सोहळ्याला तिचा पुत्र एंड्रियास तसेच काही निवडक नातेवाईक उपस्थित होते. हा विवाहसोहळा इटलीत एका यॉट पार्टीने सुरू झाला, ज्यात निवडक मित्र सामील झाले होते. एमीच्या विवाह सोहळ्याची छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. प्रवास आता सुरू झाला आहे अशी कॅप्शन एमीने या छायाचित्रांना दिली आहे.

एमी जॅक्सन आणि एड वेस्टविकला चाहते तसेच कलाकारांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. विवाहासाठी वेस्टविकने व्हाइट आणि ब्लॅक कलरचा टक्सिडो परिधान केला होता. तर एमीने व्हाइट कलरचा सुंदर गाउन घातला होता. एमी ही मागील दोन वर्षांपासून एड वेस्टविकला डेट करत होती. इटलीच्या अमाल्फी कोस्टमध्ये दोघांनी विवाह केला आहे. तत्पूर्वी जानेवारी महिन्यात दोघांनी एंगेजमेंट केली होती. एमी यापूर्वी उद्योजक जॉर्ज पानायियोटौला डेट करत होती तसेच त्याच्यासोबत तिने एंगेजमेंट देखील केली होती. एंड्रियास हा एमी आणि जॉर्ज यांचा पुत्र आहे.  जॉर्जसोबतचे नाते संपुष्टात आल्यावर एमी ही ब्रिटिश अभिनेता एडच्या प्रेमात पडली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.