‘ऐ वतन मेरे वतन’चा ट्रेलर सादर
सारा अली खान स्वातंत्र्यसेनानीच्या भूमिकेत
सारा अली खानचा चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’चा ट्रेलर 4 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. सत्यघटनेवर प्रेरित हा चित्रपट 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. हा चित्रपट भारताचा स्वातंत्र्यलढ्याच्या वेगळ्या पैलूची कहाणी दर्शवितो.
देशभक्तीच्या भावनेने भरपूर या थ्रिलर-ड्रामा चित्रपटाची निर्मिती करण जौह्र, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. कन्नन अय्यर यांच्या दिग्दर्शनात तयार या चित्रपटाची कहाणी अय्यर आणि दरब फारुकी यांनी लिहिली आहे. यात सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. तर इमरान हाशमी, सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, एलेक्स ओ नील आणि आनंद तिवारी यांनीही यात काम केले आहे.
ऐ वतन मेरे वतन हा चित्रपट 21 मार्च रोजी भारतासमवेत 240 देशांमध्ये स्ट्रीम होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत पाहता येणार आहे. साराने यात उषा मेहता यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. उषा मेहता यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले होते. त्यांनी एक गुप्त रेडिओ स्टेशन चालविले होते.
अशाप्रकारची दमदार भूमिका साकारणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. हा अनुभव मला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. हा चित्रपट असंख्य नायकांच्या बलिदानाची आठवण करून देणारा आहे. आमच्या देशाची, विशेषकरून युवांच्या मनात असलेल्या भावनांची ही कहाणी असल्याचे साराने नमूद केले आहे. सारा लवकरच मर्डर मुबारक या चित्रपटात दिसून येणार आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी पाहता येणार आहे.