कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘द फॅन्टॅस्टिक फोर’चा ट्रेलर प्रदर्शित

06:12 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पृथ्वीला वाचविण्यासाठी येत आहेत चार सुपरहिरो

Advertisement

मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या जगतात आणखी चार सुपरहिरोंची एंट्री होत आहे. मार्वलने सुपरहिरोवर आधारित अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता युनिव्हर्समध्ये आणखी एक चित्रपट सामील होणार असून यात चार सुपरहिरो दिसून येतील. मार्वलचा आगामी चित्रपट ‘द फॅन्टास्टिक फोर फर्स्ट स्टेप’  असणार आहे.

Advertisement

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो चार भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. ट्रेलरची सुरुवात 4 अंतराळवीरांची असून ते अंतराळात जातात आणि पृथ्वीवर परतल्यावर पूर्णपणे बदलून जातात, त्यांचे जीवन आनंदात सुरू असताना खलनायकाची एंट्री होते, जो पृथ्वीला नष्ट करण्यासाठी पुढे येत असतो. अशा स्थितीत चार सुपरहिरो पृथ्वीला शत्रूंपासून वाचविण्याचे काम करतात. अखेरच्या दृश्यात खलनायकाची झलक दिसून येते.

मॅट शेकमॅनच्या दिग्दर्शनात तयार आगामी चित्रपट द फॅन्टास्टिक फोर फर्स्ट स्टेप 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात पेड्रो पास्कल (मिस्टर फॅन्टास्टिक), वॅनेसा किर्बी (इनविजिबल वुमन), जोसफ क्विन (ह्यूमन टॉर्च), एबोन मॉस (द थिंग), राल्फ इनेसन (गॅलेक्ट्स) आणि जूलिया गार्नर (सिल्वर सर्फर), पॉन वॉल्टर हाउजर, जॉन माल्कोविच, नताशा लियोन आणि सारा नाइल्स यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article