For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यल्लम्मा डोंगरावर दिवसभर वाहतूक कोंडी

11:20 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
यल्लम्मा डोंगरावर दिवसभर वाहतूक कोंडी
Advertisement

माघी पौर्णिमेचा शेवटचा दिवस असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावर मंगळवारी सकाळी 10 ते सांयकाळी 5 पर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. कडक उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या भाविकांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तारांबळ उडाली. माघी पौर्णिमेचा शेवटचा दिवस मंगळवार असल्याने भाविक पहाटेपासूनच बेळगावमार्गे, धारवाड, सौंदत्तीमार्गे व विजापूर मार्गाहून बस, कार, टमटम रिक्षा, टॅक्टर, मोटारसायकलसह देवीच्या दर्शनाला निघालेले चित्र पाहावयास मिळत होते. रस्त्याकडेला वाहने उभी केल्याने टेकडीपासून तीन ते चार कि. मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे डोंगर फुलून गेला होता. देवीच्या दर्शनासाठी तीन ते चार तास रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले.

Advertisement

वाहतूक विस्कळीत

देवीच्या मंदिरापासून 3 कि. मी. वरच डोंगराच्या चढतीवर तिन्ही मार्गांवरून येणाऱ्या कार, टमटम रिक्षा, टॅक्टर, दुचाकी व कर्नाटक, महाराष्ट्राच्या सुमारे चारशेहून अधिक बसेसचा ताफा डोंगरावर आल्याने डेंगरावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दूरवरच बसेस व इतर वाहने थांबविल्याने भाविक पायी जात होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. न•ा हे बेळगाव दोऱ्यावर आले असून उद्या बुधवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बेळगाव दौऱ्यावर येत असून बंदोबस्तासाठी पोलीस गेल्याने सदर समस्या निर्माण झाली.

Advertisement
Tags :

.