वाहतूक नियमांचे उल्लंघन; 5.98 कोटी वसूल
बेंगळूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल थकीत दंड भरण्यासाठी 50 टक्के सूट देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एकाच आठवड्यात 5.98 कोटी रुपये दंड वसूल झाला आहे. परिवहन खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. 21 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत 50 टक्के दंड भरण्याचा सवलतीचा आदेश जारी केला. त्यानुसार 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत केवळ एका आठवड्यात वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी वाहनधारकांनी 5,98,28,800 रुपये दंड भरला आहे. दरम्यान, 2,25,511 वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राज्यातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून 12 डिसेंबरपर्यंत 50 टक्के दंड सवलत देण्यात आली आहे. वाहनधारक दंड सवलतीची रक्कम केएसपी, बीटीपी, बेंगळूर वन, कर्नाटक वन आणि वाहतूक पोलीस, ऑनलाईन देखील भरू शकतात. 12 डिसेंबरनंतर दंड पूर्णपणे भरावा लागेल.