महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पोलीस जाणीव सेवा संघातर्फे वाहतूक पोलिसांचा सत्कार

11:28 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर / किणये

Advertisement

पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने व संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी बालाजी फडणीस यांच्या आदेशानुसार बेळगाव येथील काही धाडसी वाहतूक पोलिसांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव उत्तर भागातील वाहतूक पोलीस कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस जाणीव सेवा संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रभाकर पाटील होते. पोलिसांचा गौरव पोलीस निरीक्षक श्रीशैल गावी यांच्या सूचनेनुसार करण्यात आला.

Advertisement

एएसआय ए. जी. घोरी, ए. एम. बजंत्री, हेड कॉन्स्टेबल बी. एम. बीजगती, पोलीस कॉन्स्टेबल महेश लोकरे, काशिनाथ त्रिगार, हेड कॉन्स्टेबल वीरेंद्र हुळी, सुरेश कोप्पद, अली होसमणी, पोलीस कॉन्स्टेबल रुद्रेश गोडची, संजय बडकुंद्री, योगेश तळेवाड, एएसआय अमर शहापूरकर, पोलीस निरीक्षक श्रीशैल गावी, अर्जुन मिशी आदींचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख महेश सारावरी, प्रशांत पाटील, सुनील कांबळे, शाखाध्यक्ष येळ्ळूर, ज्ञानेश्वर कलमठ, महादेव पाटील, ज्योतिबा भास्कर, लातूर शाखेचे सदस्य आदित्य विलास पाटील आदींसह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस जाणीव सेवा संघामार्फत वाहतूक पोलिसांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल काही पोलिसांनीही मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tbdsocialmedia
Next Article