महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सोमवारपेठ परिसरात वाहतूक कोंडी

10:55 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहनांच्या लांबचलांब रांगा : वाहनचालकांचे हाल, पोलिसांचीही कसरत 

Advertisement

बेळगाव : आरपीडी परिसरात मतमोजणी असल्याने बॅरिकेड्स लावून मुख्य रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे वाहनचालकांची मोठी दमछाक झाली. सर्व वाहतूक सोमवारपेठ-टिळकवाडी मार्गे वळविण्यात आली होती. परिणामी सोमवारपेठमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली. दुचाकी, चारचाकीसह ट्रकदेखील वाहतूक कोंडीत अडकल्याने यातून बाहेर पडताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले. कार्यकर्त्यांची गर्दी होऊ नये यासाठी आरपीडी चौककडे येणाऱ्या सर्व लहान रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यामुळे हिंदवाडीतील नागरिकांना टिळकवाडीत जाण्यासाठी गोवावेसमार्गे सोमवारपेठतून जावे लागले. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. गोगटे सर्कलमार्गे खानापूर तसेच मच्छे, पिरनवाडी,  खादरवाडी या ग्रामीण भागात जाणाऱ्या वडाप गोवावेसमार्गे वळविण्यात आल्या होत्या. बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपली वाहने सोमवारपेठ परिसरातच लावली होती. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सकाळी कार्यालयात जाण्याच्या वेळेतच वाहतूक कोंडी झाल्याने नोकरदारांमधून नाराजी व्यक्त होत होती. अनेकांनी पोलिसांसमोर आपला रोषही व्यक्त केला. वाहतूक नियंत्रण करताना पोलीसही वैतागून गेले होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article