कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोकाट जनावरांमुळे चक्काजाम

12:49 PM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

किर्लोस्कर रोडवर तब्बल दीड ते दोन तास वाहतुकीची कोंडी : महानगरपालिका लक्ष देणार का?

Advertisement

बेळगाव : शहरातील सतत गजबजलेला आणि मुख्य रस्ता म्हणून ओळखलेल्या किर्लोस्कर रोडवर मोकाट जनावरांनी ठाण मांडल्याने शुक्रवारी चक्काजाम झाला. एक, दोन नव्हे तर चक्क वीसहून अधिक जनावरे त्याठिकाणी बराच वेळ थांबून असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. जवळपास दीड ते दोन तास वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांनाही ये-जा करणे मुश्कील झाले होते. अशा प्रकारे मोकाट जनावरे रस्त्यावरच उभे राहात असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही जनावरे गजबजलेल्या ठिकाणी रस्त्यावर बसत असतात. तर काही जनावरे रस्त्याच्या मधोमधच उभी असतात. त्यामुळे ये-जा करणे अवघड झाले आहे. ही मोकाट जनावरे भाजी विक्रेत्यांची भाजीच फस्त करत आहेत. त्यामुळे त्या गरीब भाजी विक्रेत्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

शुक्रवारी किर्लोस्कर रोडवर रस्त्याच्या मधोमधच 15 ते 20 जनावरे उभी होती. त्यामुळे जवळपास दीडतास त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. सध्या श्रावणमास सुरू आहे. त्यामुळे खरेदीसाठी ग्रामीण भागाबरोबरच उपनगरातील जनता मुख्य बाजारपेठेकडे येत आहे. मुख्य बाजारपेठेला जाणारा हा रस्ता आहे. त्या रस्त्यावरच ही घटना घडल्यामुळे त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिका या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article