महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यायालयाच्या आवारात पुन्हा वाहतूक कोंडी

10:35 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये नेहमीची वाहतुकीची कोंडी होत आहे. पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो असफल ठरत आहे. मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास वाहतुकीची कोंडी झाल्याने जेएमएफसी न्यायालयाचे गेट बंद करण्याची वेळ आली होती. यामुळे वकील व पक्षकारातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आवारामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. यातच सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे या न्यायालयाच्या आवारात चिखलाचे साम्राज्य देखील पसरले आहे. दोन दिवसापूर्वी ड्रेनेज पाईपलाईनसाठी चर मारण्यात आली आहे. त्यामुळे आणखी चिखल झाला असून वाहने पार्किंग करणे अवघड झाले आहे.

Advertisement

सलग सुट्यांमुळे वाहतूक कोंडी

Advertisement

सलग दोन दिवस सुटी असल्यामुळे मंगळवारी न्यायालयामध्ये गर्दी झाली. पाऊस असल्याने वकिलाबरोबर पक्षकारांनी चारचाकी वाहने आणली होती. त्यामुळे पार्किंगसाठी जागाच मिळाली नाही. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांना ताटकळत थांबावे लागले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article