महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्वरी उड्डाणपुलासाठी वाहतूक वळविली

04:30 PM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस फौजफाट्यामुळे वाहतुकीची कोंडी नाही : अवजड वाहने दोडामार्ग, डिचोली, सांखळीमार्गे

Advertisement

पणजी : पर्वरी येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर उड्डाणपुलाचे काम सुऊ झाल्यानंतर काल सोमवारपासून या महामार्गावरील गाड्या वळविण्यासाठी प्रायोगात्मकदृष्ट्या प्रयत्न सुऊ झाले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली नाही. दरम्यान, गोवा सरकारने सोमवारपासून सर्व अवजड वाहनांना पत्रादेवीवऊन गोव्यात प्रवेश करण्यास बंदी घातली असून सर्व  वाहने बांदा, दोडामार्ग, डिचोली, सांखळीमार्गे वळविण्यात आली आहेत. पर्वरीच्या राष्ट्रीय महामार्गावरील ऊंदीकरण अशक्य ठरत असल्याने त्याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या सहा कि.मी. लांबीच्या उड्डाणपुलाचे काम कंत्राटदार कंपनीने सुऊ केले आहे.

Advertisement

सरकारने प्रायोगिक तत्वावर काल सोमवारी पर्वरी येथे एका ठिकाणी आणि गिरी येथेही एका ठिकाणी वाहतूक वळविण्यास प्रारंभ केला आहे. आल्तो पर्वरी व पर्वरी जुना बाजार ते गिरी या दरम्यान वाहने वळविलेल्या भागात पोलीस तैनात केले होते. त्यामुळे काही वाहने सकाळी अडकून पडली. परंतु, फार मोठी वाहतूक कोंडी झाली नाही. कारण तत्पूर्वीच अवजड लॉरी, ट्रक व तत्सम वाहनांचा मार्ग वळविला आणि ती वाहने दोडामार्ग, डिचोली, सांखळीमार्गे वळविण्यात आली. राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वाहतूक वळविण्याचे ठरविले आहे. ऐन गणेशचतुर्थी उत्सवाच्या काळात वाहनांची गर्दी वाढणार असल्याने त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अवजड वाहने वळविल्याने सुरळीत वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय मिळाला आहे. पुढील 15 दिवस राज्यात गणेशचतुर्थी उत्सावाच्या तयारीसाठीच्या प्रवासामुळे वाहने वाढणार असल्याने हा प्रवास म्हणजे अडचणीचा ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article