Solapur News : सोलापुरात वाहतुकीला अडथळा; महापालिकेने केली तत्काळ दुरुस्ती
सात रस्ता येथील आडवा झालेला पथदिव्याचा खांब काढला तत्काळ
सोलापूर : शहरातील सात रस्ता येथील रस्त्याच्या मध्ये असलेला पथदिव्याचा विद्युत खांब वाहनाने घडक दिल्याने आडवा झाला. यामुळे येथील वाहतुक खोळंबली. त्याची माहिती मिळताच महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी तत्काळ विद्युत विभागाला सूचना केल्या. तातडीने तो खांब रस्त्याच्या कडेला फुटपाथवर काढून ठेवण्यात आला. या सतर्कतेमुळे येथील खोळंबलेली वाहतूक सुरळीत आली.
सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सात रस्ता येथील इंडिया टी जवळील रस्त्याच्या मध्ये असलेला पथदिव्याचा विद्युत खांब एका वाहनाच्या धडकेने पूर्णपणे आडवा झाला. रस्त्यावरच हा खांब आडवा झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांना समजताच त्यांनी महापालिका विद्युत विभागाचे अभियंता महादेव इंगळे यांना सूचना दिल्या. तत्काळ त्यांनी कार्यवाही केली.
अवघ्या २० २५ मिनिटात आडवा झालेला पथदिव्याचा खांब काढून शेजारीच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठेवण्यात आला. या सतर्कतेमुळे अवघ्या काही मिनिटातच खोळंबलेली वाहतूक अखेर पूर्ववत सुरू झाली.
महापालिका उपायुक्त आशिष लोकरे आणि विद्युत विभागाचे अभियंता महादेव इंगळे यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली. या सतर्कतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.