कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस बंद पडल्याने रहदारीस अडथळा

11:22 AM Jul 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

न्यायालयाच्या गेटनजीक घडला प्रकार : त्वरित बस हलविल्याने रहदारी पूर्ववत

Advertisement

बेळगाव : न्यायालयाच्या गेटनजीक परिवहन मंडळाची बस तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. यामुळे नागरिकांची मार्गक्रमण करताना गैरसोय झाली. मात्र काही वेळानंतर बंद पडलेल्या बसला परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून दुसऱ्या वाहनाच्या साहाय्याने डेपोमध्ये घेऊन जाण्यात आले. यामुळे रस्त्यावरील रहदारी पूर्ववत झाली. न्यायालय परिसरात सतत नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध सरकारी कार्यालयेही असल्याने या परिसरात नेहमीच गर्दी असते. याचबरोबर मुख्य रस्ता असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात नेहमीच ये-जा असते. सदर बस खानापूरहून बेळगावकडे येत होती. मात्र न्यायालच्या गेटनजीक येताच तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडली. यामुळे रहदारीस काही वेळा अडथळा निर्माण झाला होता. याची त्वरित दखल घेऊन परिवहन कर्मचाऱ्यांकडून तात्काळ दुसऱ्या वाहनाच्या मदतीने बस डेपोमध्ये नेलाr. यामुळे नागरिक व वाहनधारकांना मार्गक्रमण करणे सोपे झाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article