For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरेबागेवाडी परिसरात पावसामुळे वाहतूक खोळंबली

10:53 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिरेबागेवाडी परिसरात पावसामुळे वाहतूक खोळंबली
Advertisement

वार्ताहर /बाळेकुंद्री

Advertisement

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी व परिसरातील बस्सापूर-अरळीकट्टी भागात  शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दोन तास वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने परिणामी हिरेबागेवाडी गावात व शिवारात पावसाने हाहाकार माजवत सर्वत्र पाणीच पाणी केले आहे. विजेच्या कडकडाटांसह वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळल्याने शिवारातील तरकारी पिके जमीनदोस्त झाल्या आहेत. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे हिरेबागेवाडी गावातील नाले, गावागावातील ओढ्यांना पूर आला. रत्यांनाही  ओढ्याचे स्वरूप आल्याने काही काळ जनजीवन ठप्प झाले. तर हिरेबागेवाडी-बैलहोंगल मार्गावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.गावात मुसळधार पावसामुळे गटारीचे पाणी गावात शिरल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

Advertisement
Advertisement
Tags :

.