दाभोळकर कॉर्नरला वाहतुक कोंडी नित्याचीच
कोल्हापूर / रुपाली चव्हाण :
कोल्हापूरचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून दाभोळकर चौकाची ओळख आह़े रात्रंदिवस या रस्त्यावर वर्दळ असते. दुचाकीपासून ट्रॅव्हल्सपर्यंतच्या वाहनांची या चौकात सिग्नल सुटल्यानंतर गर्दी होत़े याठिकाणी कोल्हापूरचे बसस्थानक, बँका आहेत़ दवाखाने, क्लासेस, शाळा आहे. तसेच काही अंतरावर रेल्वे स्टेशन आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागापर्यंत एसटी मार्ग जोडलेला आह़े व्हीनस कॉर्नरकडे जाताना चौकात दिशादर्शक फलक लावला आह़े तो झुडपामुळे दिसून येत नाह़ी त्यामुळे बाहेरून आलेल्या प्रवाशांना वाहने थांबवून पता विचारावा लागत आह़े यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आह़े झेब्रा क्रॉसिंग पट्टे चारी बाजूस अत्यावश्यक आहेत तही ठळकपणे. रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांचे स्टॅन्डिंग बोर्ड असून वाहन चालवताना तारेवरची कसरत होत आहे. लवकरात लवकर या मार्गावरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आह़े
- वाहतूक कोंडीवर काही उपाय
-चौकात चारी बाजूस झेब्राक्रॉसिंगचे पाढंरे पटटे् ठळक करावेत
-व्हीनस कॉर्नकडे जाताना दिशादर्शक फलकावरील झुडपांचा अडथळा प्रशासनाने लवकर काढाव़ा
-रस्त्याच्या कडेला लावलेले बॅनर, स्टँडिंग बोर्ड हटवने गरजेचे
-चौकात वाहतूक नियंत्रण केबीनमधील कचरा काढावा
- लोखंडी ब्रिज नावालाच
या चौकात जो पादचारी लोखंडी पूल आह़े तो फक्त नावालाच आह़े त्याचा पर्यायी पादचाऱ्यांना जाण्यासाठीचा मार्ग असून त्याचा वापर कोणी कारताना दिसत नाह़ी डिवायडरवरून उडीमारून पलिकडे प्रवाशी जातात़ या पुलावरून सात नंतर रात्रीच्यावेळी महिलांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित नाह़ी लाईट नाह़ी अस्वच्छता आहे.
- पुलाच्या बाजुस अनधिकृत रिक्षा स्टाप
पुलाखाली केएमटी बस थांबा असून या थांबाला लागून रिक्षा स्टाप आहे . त्यामुळे या अवारात गर्दी खुप होत़े बस थांबाच्या आवारात 100 मीटर अंतरावर नियमानुसार कोणताही रिक्षा स्टॉप करता येत नाह़ी रस्त्याकडेला फुटपाथवरच जुन्या गाड्यांचा विक्री व्यावसाय आह़े
- कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याची दुरवस्था
चौकातून सीबेएसकडे जाताना कर्मवीर भाउढराव पाटील यांचा पुतळा असून ते महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ होत़े, अशा या महान विचारवंताच्या पुतळ्याची अवस्था खराब आह़े याठिकाणी कचरा, दारुच्या बाटल्या आहेत़ या परिसरात अंधार असतो.
- लोकनेते क़ै बाळासाहेब देसाई चौकात वाहतूक कोंडी
या चौकात ट्रॅव्हल्स, आराम बस उभ्या असतात़ चौकाच्या बाजूस प्राथमिक शाळा असून येथे वर्दळ असते, फुले विक्री व्यवसायिकाची दुकाने, हॉटेल्स आहेत़ मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाहतूक केंडी खूप आह़े सिग्नल नसल्याने वाहनधारक बेशिस्त वाहने चालवतात़ काही वेळा वादावादी होते.
- पावसाळ्यात रस्त्याची अवस्था दयनीय
दाभोळकर चौकात पावसाळ्यात रस्त्याकडेला दुतर्फा पाणी खूप प्रमाणात साचते. दुचाकी वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्याच्या कडेला पाणी निचरा होण्यासाठी खुली जमीन नाह़ी पासवाचे पाणी मुरत नाह़ी