कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : म्हसवड रथोत्सवानिमित्त वाहतूक बदल; SP तुषार दोशींचा महत्वपूर्ण निर्णय

05:42 PM Nov 21, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                       भाटकी रोड व माळशिरस चौकातून वाहतुकीचे पुनर्विनियोजन

Advertisement

म्हसवड : पश्चिम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी रथोत्सव यात्रे निमित्ताने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी म्हसवड गावातुन जाणारा, सातारा ते पंढरपुर व म्हसवड ते आटपाडी या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करुन अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी ७ वाजल्या पासून ते रात्रौ १०.०० वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल केल्याचे सपोनि अक्षय सोनावणे यांनी सांगितले.

Advertisement

असे असणार मार्ग

सातारा ते पंढरपुर व माळशिरस बाजुकडे जाणारी दोन चाकी व सर्व हलकी वाहने ही शिंगणापुर चौक येथुन युबराज सुर्यवंशी यांचे निवासस्थान समोरुन शिक्षक कॉलनी भाटकी रोड - भाटकी गाव - माळशिरस चौक येथुन जातील. -
पंढरपुर व माळशिरस ते सातारा बाजुकडे जाणारी दोन चाकी व सर्व हलकी वाहने ही माळशिरस चौक भाटकी गाव भाटकी रोड शिक्षक कॉलनी- युबराज सुर्यवंशी यांचे निवासस्थान समोरुन शिंगणापुर चौक येथुन जातील.सातारा ते पंढरपुर व माळशिरस बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक ही पोळ पेट्रोल पंपाच्या पाठीमागुन खांडेकर तालीम शिक्षक कॉलनी- भाटकी रोड - भाटकी गाव माळशिरस चौक येथुन जाईल.
पंढरपुर व माळशिरस ते सातारा बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक ही माळशिरस चौक - भाटकी गाब भाटकी रोड शिक्षक कॉलनी- खांडेकर तालीम - पोळ पेट्रोल पंप येथुन सातारा बाजुकडे जाईल.
सातारा व फलटण बाजुकडुन आटपाडी बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही मायणी चौक येथुन कुकुडवाड मुख्य रस्ता नागोबा मंदीर मेगासिटी वीरकरवाडी येथुन आटपाडीकडे जाईल.
-आटपाडी बाजुकडुन सातारा व फलटण बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही बीरकरवाडी मेगासिटी नागोबा मंदीर कुकुडबाड मुख्य रस्ता मायणी चौक येथुन जाईल. तसेच बीरकरवाडी ते म्हसवड व रथगृह ते सरकारी दवाखाना हे रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#FestivalTraffic#JogeshwariMata#PoliceAdvisory#SataraPandharpur#SiddhanathYatra#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#TrafficDiversionMhaswad Rathotsav Traffic DiversionMhaswadRathotsavMhaswadUpdatesSatara Pandharpur Route ChangeSiddhanath Jogeshwari Yatra
Next Article