कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावमध्ये आज पारंपरिक शिवजयंती

11:39 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिवज्योतींचे होणार स्वागत, तयारीला वेग

Advertisement

बेळगाव : बेळगावमध्ये परंपरेप्रमाणे मंगळवार दि. 29 रोजी शिवजयंती जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी होणार आहे. 106 वर्षांची देदीप्यमान परंपरा बेळगावच्या शिवजयंतीला असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात शिवजयंती होणार आहे. यानिमित्ताने अनेक शिवप्रेमी शिवज्योत आणण्यासाठी गडकिल्ल्यांवर गेले असून मंगळवारी सकाळी ते बेळगावमध्ये दाखल होतील. बेळगाव शहर व परिसरातील शिवजयंती उत्सव मंडळे शिवजयंती साजरी करतात. मंगळवारी मध्यवर्ती शिवजयंती मंडळाच्यावतीने नरगुंदकर भावे चौक व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी शिवजयंती साजरी होणार आहे. याचबरोबर शिवप्रेमींकडून प्रत्येक गल्ली व कोपऱ्यावर शिवजयंतीसाठी मंडप उभारणी करण्यात आली आहे. शिवजयंती दिवशी शिवज्योत आणण्याची परंपरा असल्यामुळे  बेळगाव परिसरातील गडकिल्ल्यांवर शिवज्योत आणण्यासाठी शिवप्रेमी सोमवारी रवाना झाले होते. गुरुवार दि. 1 मे रोजी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. याची जय्यत तयारी मंडळांकडून केली जात आहे. ढोलताशा तसेच लाठीमेळ्याचा सराव सुरू आहे. गुरुवारी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यासाठी बालचमूंसह वयोवृद्ध सजीव देखाव्यांची तयारी करीत आहेत.

Advertisement

शहापूर शिवजयंती महामंडळाचे कार्यक्रम

मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाच्यावतीने शिवजयंतीनिमित्त मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील शिवमूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. गुरुवार दि. 1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता बॅ. नाथ पै चौक येथून मान्यवरांच्या उपस्थितीत चित्ररथ मिरवणुकीचा उद्घाटन सोहळा होणार असून त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होईल. ही मिरवणूक शहापूर खडेबाजार मार्गे शामा प्रसाद मुखर्जी रोड, रेल्वे ओव्हरब्रिज मार्गे स्टेशन रोड, अंबाभुवन सर्कल, सेंट मेरी हायस्कूल मार्गे कॅम्प, उभा मारुती येथून धर्मवीर संभाजी चौकात मुख्य मिरवणुकीत चित्ररथ सहभागी होणार आहेत. यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव, माजी उपमहापौर संजय शिंदे, श्रीकांत प्रभू यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article