कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतावरील व्यापारी शुल्क कमी करणार

06:02 AM Nov 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांच्याकडून स्पष्ट आश्वासन

Advertisement

► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

Advertisement

भारतासमवेत लवकरच एक न्यायोचित व्यापारी करार केला जाईल आणि भारतावरचे व्यापारी शुल्क कमी केले जाईल, असे स्पष्ट आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिले आहे. या व्यापारी करारानंतर भारताचे लोक पुन्हा आमच्यावर प्रेम करु लागतील, अशीही टिप्पणी डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे.

भारताशी अमेरिकेची व्यापारी चर्चा सातत्याने होत आहे. या चर्चेत लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही देशांमध्ये व्यापारी करार होणार हे निश्चित आहे. भारताशी होणारा व्यापारी करार आता अंतिम स्थितीत आहे. या करारासोबतच भारतावरील व्यापारी शुल्क कमी केले जाणार आहे. त्यामुळे भारतीय लोकांना आनंद होणार आहे, असे सुस्पष्ट वक्तव्य डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे.

सर्जिओ गोर यांचा शपथविधी

अमेरिकेने भारतासाठी नियुक्त केलेले राजदूत सर्जिओ गोर यांचा शपथविधी मंगळवारी अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये पार पडला. त्यावेळी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी भारतावरील व्यापारी शुल्क कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. पत्रकारांनी त्यांना या संदर्भात प्रश्न विचारले होते. त्यांची त्यांनी अत्यंत सकारात्मक स्वरुपात उत्तरे दिली आहेत. त्यामुळे लवकरच भारत आणि अमेरिका यांच्यात करार होणार अशी शक्यता स्पष्टपणे निर्माण झाली आहे.

ते माझ्यावर करतील प्रेम

भाराताशी आम्ही व्यापारी करार करत आहोत. हा करार सध्याच्या स्थितीपेक्षा खूपच भिन्न असेल. माझा विश्वास आहे, की हा करार झाल्यानंतर भारतीयांना आनंद होईल. सध्या भारतीय लोक माझ्यावर काहीसे रागावलेले दिसतात. तथापि, हा करार झाल्यानंतर ते निश्चितच पुन्हा माझ्यावर ‘प्रेम’ करु लागतील. आम्ही करार करण्याच्या अगदी नजीक आहोत. हा करार दोन्ही देशांसाठी लाभदायक असेल, हे निश्चित आहे, अशी भलावणही अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली आहे.

रशियाचा संबंध

भारताने रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची आयात करणे चालूच ठेवले होते. त्यामुळे आम्ही भारतावर 50 आयातशुल्क लागू केले होते. पण आता भारताने रशियाकडून केली जाणारी तेलाची आयात बऱ्याच प्रमाणात कमी केली आहे. त्यामुळे महत्वाचा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे आम्ही भारतावरील व्यापार शुल्क कमी करणार आहोत. थोडी प्रतीक्षा करा, असा अर्थाचे वक्तव्य त्यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा प्रशंसा केली आहे. भारत ही जगातील सर्वात जुनी नागरी संस्कृती आहे. तो आज लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असून त्याची लोकसंख्या जवळपास 150 कोटी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे आणि अमेरिकेचे अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. मी नियुक्त केलेले अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र बनलेले आहेत. गोर यांच्यामुळे दोन्ही देशांमधील स्नेहाचे संबंध आणखी दृढ होणार आहेत. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध निश्चितच कौतुकास्तद आहेत. त्यामुळे आमच्यातील व्यापारी करार लवकरच होईल, अशी भलावण ट्रंप यांनी केली आहे.

व्यापार करार चर्चा वेगवान

अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर आता भारत आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींनी वेग घेतला आहे. त्यामुळे एक महत्वाचा आणि ऐतिहासिक करार दृष्टीपथात आला आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक संवेदनशील मुद्दे आहेत. तथापि, सर्व अडसर लवकरच दूर होणार आहेत. आमची करारासंबंधीची प्रगती उत्कृष्ट होत आहे. अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार होती. त्यामुळे साहजिकच चर्चा पूर्ण होण्यास विलंब लागणे स्वाभाविक होते. पण आता चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. असे प्रतिपादन भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे.

दोन्ही देश सकारात्मक स्थितीत

ड भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावर दोन्ही देश सकारात्मक

ड व्यापारी करारासंबंधी चर्चा आता आहे अंतिम टप्प्यात : डोनाल्ड ट्रंप

ड चर्चा वेगवान बनविण्यात सर्जिओ गोर यांची अत्यंत महत्वाची भूमिका

ड भारताचे राजदूत म्हणून सर्जिओ गोर यांचा व्हाईट हाऊसमध्ये शपथविधी

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article