For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायलसोबतचे व्यापारी संबंध तुर्कियेकडून संपुष्टात

06:43 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायलसोबतचे व्यापारी संबंध तुर्कियेकडून संपुष्टात
Advertisement

गाझामध्ये आवश्यक मदत पोहोचावी असे तुर्कियेचे वक्तव्य : एर्दोगान हुकुमशहा असल्याची इस्रायलची टीका

Advertisement

वृत्तसंस्था/ अंकारा

गाझावरील इस्रायलच्या कारवाईला विरोध करणाऱ्या तुर्कियेने आता इस्रायलसोबतचे व्यापारी संबंध संपुष्टात आणले आहेत. इस्रायल गाझामध्ये पुरेशी मानवीय मदतसामग्री पोहोचू देत नाही तोवर संबंध प्रस्थापित केले जाणार नसल्याचे तुर्कियेच्या व्यापार मंत्र्याने सांगितले आहे. मागील वर्षी दोन्ही देशांदरम्यान 58 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्यापार झाला होता.

Advertisement

इस्रायलच्या विदेशमंत्र्यांनी तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांना हुकुमशहा संबोधिले. एर्दोगान यांनी तुर्कियेची जनता, व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कराराकडे दुर्लक्ष केले आहे. आता आम्ही स्थानिक उत्पादनावर भर देणार आहोत. याचबरोबर अन्य देशांसोबत निर्यात वाढविण्यासाठी काम करू असे त्यांनी सांगितले आहे.

हमास विरोधी युद्धाच्या प्रारंभापासूनच तुर्कियेने इस्रायलच्या कारवाईला विरोध दर्शविला आहे. परंतु 1949 मध्ये इस्रायलला मान्यता देणारा तुर्किये हा पहिला मुस्लीम देश ठरला होता. पण कालौघात दोन्ही देशांमधील संबंध बिघडत गेले. 2010 मध्ये इस्रायली कमांडोंची तुर्कियेच्या 10 पॅलेस्टाइन समर्थक कार्यकर्त्यांसोबत झटापट झाली होती. इस्रायलने गाझापट्टीवर सागरी नाकाबंदी केली होती. म्हणजेच समुद्राच्या मार्गाने कुणीच गाझामध्ये प्रवेश करू शकत नव्हता. तुर्कियेचे कार्यकर्ते ही नाकाबंदी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करत होते. इस्रायली कमांडोंसोबत झालेल्या झटापटीत हे कार्यकर्ते मृत्युमुखी पडले होते.

या पार्श्वभूमीवर तुर्कियेने इस्रायलसोबतचे राजनयिक संबंध संपुष्टात आणले होते. यानंर 2016 मध्ये दोन्ही देशांनी पुन्हा संबंध प्रस्थापित केले होते. परंतु 2 वर्षातच गाझा-इस्रायल सीमेवरील तणावामुळे तुर्किये आणि इस्रायलने परस्परांच्या राजदूतांना देशाबाहेर हाकलले होते.

Advertisement
Tags :

.