For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : पलूस येथे ट्रॅक्टर-दुचाकी भीषण अपघात; वेल्डिंग कारागिराचा जागीच मृत्यू

01:21 PM Dec 15, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   पलूस येथे ट्रॅक्टर दुचाकी भीषण अपघात  वेल्डिंग कारागिराचा जागीच मृत्यू
Advertisement

                     विजणकाट्याजवळ अपघात; ट्रॅक्टर चालक फरार

Advertisement

पलूस : पलूस विजापूर-गुहाघर राष्ट्रीय महामार्गावर पलूस येथील वजनकाट्याजवळ ट्रॅ क्टर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात वेल्डिंग कारागिराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे कामगार जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दरम्यान अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पलायन केले  

अमोल सुधाकर ओतारी (वय ४०, रा. कातर खटाव, सध्या रा. पलूस) असे मृताचे नाव आहे. सागर रामचंद्र मोरे (वय ३८, रा. पलूस) व संदीप दत्तात्रय भोसले (वय ४०, रा. पलूस) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल ओतारी हे पलूस येथे गेल्या वीस वर्षांपासून वेल्डिंगचा व्यवसाय करतात. रविवारी ते कामगार सागर मोरे व संदीप भोसले यांना मोटारसायकलवरून तिबलसीट घेऊन निघाले होते.

Advertisement

या दरम्यान शिक्षक कॉलनीकडून वजनकाट्याजवळ आले असता महामार्ग ओलांडत असतानापलूसहून कुंडलच्या दिशेने निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. धडकेनंतर ट्रॅक्टरने दुचाकी काही अंतर फरफटत नेली. या भीषण अपघातात ट्रॅक्टरची पुढील दोन्ही चाके मोटारसायकलस्वार ओतारी यांच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सागर मोरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून संदीप भोसले किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघातानंतर ओतारी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पलूस ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. करून पुढील उपचारासाठी सांगली मोरे यांच्यावर प्राथमिक उपचार येथे हलवण्यात आले आहे. मयत अमोल ओतारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच कातर खटाव व पलूस येथील नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेने ओतारी यांच्या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत पलूसपोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर जंगम करीत आहेत.

Advertisement
Tags :

.