For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत बेपत्ता युवकाचा काळ्या खणीत मृतदेह आढळला

01:33 PM Dec 15, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत बेपत्ता युवकाचा काळ्या खणीत मृतदेह आढळला
Advertisement

                             काळ्या खणीतील मृतदेहामुळे पुन्हा वाद ऐरणीवर

Advertisement

सांगली : संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील शिराज इब्राहिम मुल्ला (वय २१ वर्षे, रा. राम रहीम कॉलनी) हा युवक बेपत्ता झाला होता. त्याच्या नातेवाईकांनी याबाबत संजय नगर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग असल्याची नोंद केली होती. दरम्यान या युवकाचा मृतदेह विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीतील काळी खण परिसरात पाण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

या काळ्या खणीतील पाण्यावरुण सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कालच त्यांनी यासंदर्भात आंदोलन केले होते. काण्या खणीच्या सुशोभिकरणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. त्यातच हा मृतदेह आढळून आहे, त्यामुळे हा मुद्दा एरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काळ्या खणीत एक मृतदेह दिसून आला, त्याची माहिती तात्काळ विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना देण्यात आली.

Advertisement

त्याठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपदा मित्र तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक दाखल झाले. खणीत मृतदेह अत्यंत अडचणीच्या ठिकाणीकाळी खण आणि अशुद्ध पाणी यावरून सामाजिक कार्यकर्ते यांनी दोनच दिवसापूर्वी याठिकाणी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले होते. त्यातच हा मृतदेह आढळून आल्या ने काळी खण पुन्हा चर्चेत आली आहे.

असून पाण्यात तीव्र दुर्गंधी येत असल्यामुळे रेस्क्यू करताना अनेक अडथळे येत होते. तसेच पाण्यात उतरण्यासाठी योग्य जागा नसतानाही स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी अथक प्रयत्न करून सुरक्षितपणे मृतदेह बाहेर काढला. यावेळी बघ्याची मोठी गर्दी जमली होती.रेस्क्यू पूर्ण केल्यानंतर मृतदेह पुढील तपास व शवविच्छेदनासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कमांडर कैलास वडर यांच्यासह सागर जाधव, आसिफ मकानदार, इरशाद कवठेकर, महेश गव्हाणे, आकाश कोलप, अनिल बसरगट्टी, योगेश कदम आदी जवान घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेने काळ्या खणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Tags :

.