सरत्या वर्षात ट्रॅक्टर विक्रीचा नवा उच्चांक
कोल्हापूर :
देशभर सरासरी चांगला पडलेला चांगला पाऊस, शेतीमालाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुधारणा, विविध शासकीय योजना, सुलभ कर्ज पुरवठा, प्रसिद्ध ट्रॅक्ट ब्रँड्सद्वारे उच्च एचपी ट्रॅक्टरचा शोध आदी कारणांमुळे भारतातील ट्रॅक्टर विक्रीने सरत्या वर्षात विक्रीची नवा उच्चांक स्थापीत के ला. 2024मध्ये 894,112 ट्रॅक्टरची विक्री झाली.
ट्रॅक्टर विक्री ही प्रामुख्याने पाऊस आणि त्यावर पिकण्राया शेतीवर अवलंबून असते. चांगला मॉन्सून नसेल तर याचा परिणाम ट्रॅक्टरविक्रीवर परिणाम होतो. 2014 साली 6 लाख 96 हजार 828 ट्रॅक्टर विक्रीचा आकडा पार झाला. यानंतर 2015 व 2016 या वर्षांत चांगला मॉन्सून झाला नसल्याने या दोन वर्षीत विक्रीमध्ये अनुक्रमे 10 टक्के आणि 9 टक्के घट झाली होती. यानंतर ट्रॅक्टर विक्रीने एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत ट्रॅक्टर उद्योगाने विक्रीमध्ये गरुड झेप घेत 16.6 टक्के वाढ नोंदविली आहे. या कालवधीत देशांतर्गत 6 लाख 59 हजार 170 ट्रॅक्टर ची विक्री झाली होती. यानंतर टॅक्टर विक्री जोमात राहिली. 2020 मध्ये आठ लाख 99 हजार 329 ट्रॅक्टर 26.9 टक्के वाढीसह विकले गेले होते. मात्र, मार्च 2021नंतर पुन्हा विक्री मंदावले. वर्षाला सरासरी साडेनऊ लाख ट्रॅक्टर युनिटस् देशात एकूण विक्री होत आहे.आता चांगल्या मान्सूनमुळे ट्रॅक्टर विक्रीला पुन्हा अच्छे दिन येतील असे चित्र आहे.
2024 मध्ये भारतीय ट्रॅक्टर उद्योगाला किरकोळ विक्रीसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (इAअ) च्या आकडेवारीनुसार, 894,112 युनिट्सची विक्री झाली. 2023 मध्ये 871,918 युनिट्सची विक्री झाली होती. तुलनेत 7.17 टक्के विक्रीची वार्षिक वाढ नोंदवली. गेल्या सहा वर्षांच्या ट्रॅक्टर रिटेलच्या एका संक्षिप्त संकलनातून असे दिसून येते की भारतात 4.71 दशलक्ष युनिट्स विकल्या गेल्या आहेत. उद्योगाने सातत्यपूर्ण वाढ नोंदवली आहे. 2022 मध्ये पहिल्यांदाच विक्रीने आठ लाखांचा टप्पा ओलांडला (813,923 युनिट्स), 2023 मध्ये 871,918 युनिट्सपर्यंत वाढ झाली. उद्योगाच्या विक्री विभागणीनुसार असे दिसून येते की बाजारपेठेतील आघाडीची कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने ट्रॅक्टर बाजारावर आपली पकड आणखी वाढवली आहे. 2024 मध्ये 375,078 युनिट्सच्या एकत्रित विक्रीसह, वार्षिक वाढ 6.17 टक्के वाढ होती. बाजारपेठेतील व्रिकीची हिस्सा 40.5 टक्क्यावरुन 42 टक्के झाला.
सोनालिका ब्रँडच्या शेती यंत्रसामग्रीचे उत्पादक असलेल्या इंटरनॅशनल ट्रॅक्टरने देशांतर्गत बाजारात 117,013 युनिट्स विकल्या, जी वार्षिक वाढ 6.41ज्ञ् आहे. टॅफेच्या चार ब्रॅण्डचा बाजारातील हिस्सा 11.54 टक्के राहिला. एस्कॉर्ट्स कुबोटा 87,444 युनिट्सच्या वार्षिक विक्रीसह चौथ्या क्रमांकावर आहे. जॉन डीअर इंडियाने 67,219 युनिट्सची विक्री झाली.आयशर ट्रॅक्टरनेही गेल्या वर्षी 56,621 युनिट्सची विक्री करून चांगली कामगिरी केली.
कोल्हापुरच्या फौंड्री उद्योगाला दिलासा
कोल्हापुरातील फौंड्री उद्योग आशिया खंडात अग्रणी आहे. देशभरातील ट्रॅक्टर निर्मिती करण्राया कंपन्यांना कोल्हापुरातील फौंड्री उदयोगात पार्टस् तयार करुन पाठवले जातात. ट्रॅक्टर विक्रीत वाढ झाल्याने कोल्हापुरातील फौंड्री उद्योग कोरोना संसर्गातही तग धरू शकला होता. दरम्यान कच्च्या मालाच्या किंमती प्रचंड वाढल्याने याचाही फटका उद्योगाला बसला. ट्रॅक्टरची उच्चांकी विक्री कोल्हापुरातील फौंड्री उद्योगाला दिलासा देणारी बाब आहे.
वर्ष ट्रॅक्टर्सची विक्री
2017 -18 7,26,026
2018-19 7,84,930
2019-20 7,07,533
2020-21 8,99,683
2021-22 8,42,196
2022-23 8,71,918
2023-24 8,94,112