For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘टोयोटा’चे ईव्ही वाहन मारुती ईव्हीएक्सवर आधारित

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘टोयोटा’चे ईव्ही वाहन मारुती ईव्हीएक्सवर आधारित
Advertisement

उत्पादन 2025 मध्ये मारुती सुझुकीच्या गुजरात प्लांटमध्ये सुरु होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

टोयोटा मोटर कॉर्पोरेशन इलेक्ट्रिक वाहन लाँच करण्याची योजना आखत आहे. हे मारुती सुझुकी इंडियाच्या आगामी इलेक्ट्रिक वाहन ईव्हीएक्सवर आधारित असेल आणि त्याचे उत्पादन 2025 मध्ये मारुती सुझुकीच्या गुजरात प्लांटमध्ये सुरू होणार आहे. भारतातील दोन्ही कंपन्यांची ही पहिली ईव्ही असेल. जपानी ऑटो दिग्गज सुझुकी मोटर कॉर्पोरेशन आणि टोयोटा मोटर यांनी बुधवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की ते टोयोटासाठी सुझुकी-विकसितबॅटरी ईव्ही स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) मॉडेल्सच्या पुरवठ्यामध्ये त्यांचे सहकार्य आणखी मजबूत करत आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर ही टोयोटा मोटरची भारतीय उपकंपनी आहे तर मारुती सुझुकी ही सुझुकी मोटरची भारतीय उपकंपनी आहे.

Advertisement

एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, ‘दोन कंपन्यांमधील युतीमधील पहिली ईव्ही कार उत्पादीत केली जाणार आहे. ही कार जागतिक स्तरावर सादर केली जाईल आणि लक्षणीय वाढ होत असलेल्या एसयूव्ही मार्केटमध्ये ईव्ही पर्याय देखील प्रदान करेल. या मॉडेलसाठी स्वीकारलेले ईव्ही प्लांट आणि प्लॅटफॉर्म सुझुकी मोटर, टोयोटा मोटर आणि डायहात्सू मोटर कॉर्पोरेशन यांनी संयुक्तपणे विकसित केले आहेत आणि प्रत्येक कंपनीच्या सामर्थ्याचा वापर केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. सुझुकी मोटर आणि टोयोटा मोटर यांच्यातील जागतिक सहकार्याची घोषणा 2018-19 मध्ये एकमेकांना वाहने आणि घटक पुरवण्यासाठी करण्यात आली. टाय-अपमध्ये त्यांच्या भारतीय उपकंपन्या-टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि मारुती सुझुकी यांच्यातील मॉडेल्सची अदलाबदली समाविष्ट होती.  टोयोटा किर्लोस्कर मोटर मारुती सुझुकीची चार रिबॅजेड मॉडेल्स विकते- बलेनोची ग्लान्झा, फ्रॉन्क्सची अर्बन क्रूझर टेसर, एर्टिगाची रुमिओन आणि ग्रँड विटाराची अर्बन क्रूझर हायरायडर.

Advertisement
Tags :

.