For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘आर्थिक अमृतकालाकडे...’

06:30 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘आर्थिक अमृतकालाकडे   ’
Advertisement

भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक वाढल्याने प्रथमच सुचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 333 लाख कोटी किंवा 4 ट्रिलियन डॉलर्स झाले. ही दीपावली नंतरची आर्थिक दीपावली ठरते. सध्या अमेरिका, चीन, जपान व हाँगकाँगनंतर 4 ट्रिलियन पेक्षा अधिक बाजारमूल्य असणाऱ्या भांडवल बाजारात भारतीय शेअर बाजार समाविष्ट झाला. हा टप्पा महत्त्वाचा ठरतो. एक वर्षाच्या कालावधीत सेन्सेक्सने 9.10 टक्के परतावा दिला असून त्यात गुंतवणूक असणाऱ्यांचा 50.81 लाख कोटीचा फायदा झाला. ही झळाळी एका बाजूला असतानाच राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ ही 3 महिन्याच्या कालावधीत 6.7 टक्के अंदाजित होती ती 7.6 टक्के अशी झाल्याने अर्थचित्र अधिक रंगतदार झाले. यात आता मॉर्गन स्टॅन्ले भांडवल बाजार निर्देशांक (श्एण्ऊ-श्दुह एtaहतब् ण्aजूत् र्घ्ह्)ो मध्ये भारताचे महत्त्व 0.4 टक्क्याने वाढवले ही बाबसुद्धा महत्त्वाची ठरते. शेअर बाजाराची उसळी, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ व जागतिक गुंतवणूक मानांकनात वाढ ही आर्थिक अमृतकाल पर्वणी समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

Advertisement

शेअरबाजारात झालेली घसघशीत वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेची भक्कम पाया दर्शवते. जागतिक पडझड ही मुख्यत्वे अमेरिकेने व्याजदरात 5.25टक्के इतकी प्रचंड वाढ केल्याने निर्माण झाली. हा धक्का सहन करीत गुंतवणूक चालना देणे हे कठीण काम भारतीय अर्थव्यवस्थेने केले. गुंतवणूक ओघ भारतीयांचा विदेशी  गुंतवणूकदारांचा सकारात्मक राहिल्याने शेअरबाजारातही तेजी दिसते. विदेशी गुंतवणूकदारांनी 8000 कोटींची गुंतवणूक वाढवली. शेअर बाजार आगामी बदलाचे सूचक असल्याने याबाबत आपली गुंतवणूक रचना बदलण्यास सर्वांनाच मार्गदर्शन मिळते. केवळ एका आठवड्यात आयपीओसाठी 3.5 लाख कोटी गुंतवणूक करणारी अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणात आता सर्वाधिक पसंतीचे केंद्र होत आहे. ही बाब अर्थधोरणाच्या यशस्वीतेचे लक्षण ठरते. विशेषत: रिझर्व्ह बँकेने महागाई& नियंत्रण व चलन व्यवस्थापन याबाबत सावधगिरीचा पवित्रा ठेवल्याने सर्वच गुंतवणूकदारांना सकारात्मक संदेश दिला.

राष्ट्रीय उत्पन्नात या तिमाहीत होणारी अपेक्षित वाढ अनेक तज्ञांच्या मते 6.7 टक्के होती. रिझर्व्ह बँकेने 6.5 टक्के वाढ अंदाजित केली होती. प्रत्यक्षात मात्र 7.6 टक्के असा वृद्धी दर झाला. ही आश्चर्यकारक वाढ मुख्यत्वे उत्पादन क्षेत्रात 13 टक्के वाढ झाल्याचे दिसते. गत तिमाहीत उणे 3 टक्के होती. याच्या जोडीला सरकारी गुंतवणूक वाढ, शहरी उपभोग खर्चात वाढ, खाण उद्योगात 10 टक्क्यांनी वाढ यातून 2011-12 च्या आधार किंमतीने भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 42 लाख कोटी डॉलर्स झाले. याचा परिणाम म्हणून देखील भांडवल बाजारात मोठी वाढ दिसते. सध्याची आर्थिक स्थिती गुंतवणूक पोषक असली तरी ग्रामीण उत्पन्न व मागणी तसेच शेती उत्पादन व उत्पन्न ही मोठी विकास केंद्रे गतिमान करण्याचे आव्हान अद्यापि मोठे आहे. जागतिक पटलावर सरासरी 6 टक्के वृद्धी दर हा इतरांच्या तुलनेत चांगला असल्याने सर्वात वेगळे व मोठ्या आकाराने वाढणारी  अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था गुंतवणुकीस प्रथम पसंतीचे ठिकाण ठरते.

Advertisement

मॉर्गन स्टॅन्ले ही न्युयॉर्कस्थित गुंतवणूक मार्गदर्शन संस्था 1969 मध्ये स्थापन झाली. जागतिक भांडवलबाजाराच्या 86 टक्के वाटा असणाऱ्या 3000 कंपन्यांचे विश्लेषण करीत आपला एमएससीआय म्हणजे भांडवल बाजार इंडेक्स तयार करते यात 23 विकसित देश व 24 नवोदित बाजार देश (िंश्-सुंग्हु श्arवे) आहेत. आपण दुसऱ्या गटात असून अडीच वर्षापूर्वी आपणास 10 टक्के महत्त्व होते ते आता 16 टक्क्यापर्यंत वाढले आहे. यामध्ये भारतातील रिलायन्स, आयसीआयसीआय व इन्फोसिस यांचे साधारण 3.12 टक्के आहे. चिनच्या 5 कंपन्यांना 30 टक्के वाटा आहे. महत्त्वाचे म्हणजे यात आता  भारतातील 174 कंपन्या समाविष्ट होत असून भारांकन 0.4 टक्क्यांनी वाढवले ही चांगली बाब आहे. यातून जागतिक गुंतवणूक प्रवाह भारताकडे वाढणार असून 100 वित्तसंस्था ज्याकडे 26 ट्रिलियन गुंतवणूक साठा आहे त्यातील 40 टक्के वित्तसंस्था चीनपेक्षा भारतास प्राधान्य देतात! जागतिक गुंतवणूक मानांकन वाढल्याने येणारे वित्तवर्ष भांडवल बाजारास उत्तम परतावा देणारे ठरण्याची शक्यता आहे.

सावधानता आवश्यक

वॉरेन बफे यांचे सल्लागार चार्ली मुंगेर यांनी शेअरबाजारात गुंतवणुकदारांना दिलेला सल्ला आपण स्वीकारणे आवश्यक आहे. येथे जुगारवृत्ती, तात्काळ लाभ, हमखास नुकसान देतात. दीर्घकालीन गुंतवणूक, विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक निर्णयच चांगला परतावा देतात व हे भारतीय भांडवल बाजाराने गेल्या 5 दशकात 15 टक्के परतावा चक्रवाढ पद्धतीने दिला. यातून सिद्ध होते. तथापि अद्यापी 6 टक्केचे गुंतवणूकदार याचे लाभार्थी असून वित्त निरक्षरता हे त्याचे कारण आहे. केवळ बाजार तेजीत म्हणून उत्साहाने येणारे थोड्या घसरणीने बाजार सोडतात. हे टाळणे व सध्या आपणाकडे असणारे कमी दर्जाचे शेअर विकून उत्तम शेअर्स वाढवणे हा पर्याय शहाणपणाचा ठरतो. सर्वसाधारण गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगणे हेच महत्त्वाचे!

प्रा.डॉ. विजय ककडे

Advertisement
Tags :

.