तरुणींना छेडणाऱ्या पर्यटकांना चोप
पोरबावाडा - कळंगुट येथील घटना : दलालांना हद्दपार करण्यासाठी आज ग्रामस्थ सरपंचांची घेणार भेट
म्हापसा : दांडिया नृत्य संपवून शनिवारी मध्यरात्रीनंतर घरी जाणाऱ्या तिघा मुलींची छेड काढणाऱ्या पर्यटकाला व त्याच्या सोबतच्या दलालास चोप दिल्याची घटना पोरबावाडा कळंगुट येथे घडली. या प्रकारामुळे संतापलेल्या स्थानिकांनी ते राहत असलेल्या फ्लॅटमधून त्यांना हुसकावून लावले. या विषयावऊन ग्रामस्थ संतापले असून सर्व दलालांना कळंगुटमधून हुसकावून लावण्यासाठी ते आज सोमवारी सरपंचांना भेटणार असल्याची माहिती कळंगुट ग्रामस्थांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वा. च्या सुमारास दांडिया संपवून घरी परतणाऱ्या तीन स्थानिक मुलींची गाडी क्र. जीए 03 एफ 3656 या गाडीतील दीपक कुमार (दिल्ली) व दलालाने छेड काढली. ‘आती है क्या, कितना लेगी’ अशी विचारणा कऊन हात पकडून त्यांच्याशी गैरवर्तन केले. यावऊन त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात मुलींनी त्या पर्यटकाला बरेच चोपले. तसेच घटनेची माहिती फोनवऊन नातेवाईकांना दिली. लगेच घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पर्यटकाला व दलाला चोप देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी नवीन क्लब सुरू झाला असून त्याच्या दुसऱ्या मजल्यावर पर्यटकांच्या राहाण्याची सोय केली आहे. त्यात काही दलाल म्हणूनही काम करतात. त्यातील दोघांनी मुलींची छेड काढल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री पंचसदस्य, ग्रामस्थांनी एकत्र येत या विषयी बैठक घेतली. त्यात कळंगुटमध्ये डान्सबार, दलालांना थारा देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला. आज सोमवारी दुपारी 12 वा. सरंपचांची भेट घेऊन दलालांना हाकलून लावावे, अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार आहे. त्यांनी मागणी मान्य न केल्यास ग्रामस्थ स्वत:हून रस्त्यावर उतऊन दलालांना हुसकावून लावतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हे प्रकार कायमचे बंद होणार : वायंगणकर
पंचसदस्य स्वप्नेश वायंगणकर म्हणाले की, ही घटना शनिवारी मध्यरात्री 2.30 वा. घडली. दांडिया संपवून घरी जाणाऱ्या मुलींशी दीपककुमार याने गैरवर्तन केले. मुलींनी धुलाई केल्यानंतर त्याने गाडीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी त्याला पकडले. त्याने येथे भाडेपट्टीवर फ्लॅट घेतला असून तेथे दलालांना ठेवले आहे. आता ग्रामस्थ जागरूक झाले असून लवकरच हा प्रकार बंद होणार असल्याचे वायंगणकर यांनी सांगितले.
आम्हाला कळंगुटमध्ये डान्सबार नको
पंच प्रसाद शिरोडकर म्हणाले की, येथे बेकायदेशीर डान्सबार येणार असल्याची माहिती सरपंचांना दिली होती. त्यानुसार त्याची तपासणी झाली आहे. मोहन शेट्टी नामक इसमाने ही जागा दीपककुमार याला भाडेपट्टीवर दिली आहे. या अगोदरही डान्सबार बंद केले होते. आताही सरपंचांना कळंगुटमधील डान्सबार बंद करण्याचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदेशीर कृत्ये आम्ही बंद पाडल्याची माहिती माजी पंच सुदेश मयेकर यांनी दिली. नितेश चोडणकर म्हणाले, डान्सबारमुळे कळंगुटचे नाव खराब होत आहे. मुख्यमंत्री, सरपंचांनी यात लक्ष घालून कळंगुट डान्सबारमुक्त करावे. तुम्ही जर हे नाही कऊ शकलात तर कळंगुटवासीय रस्त्यावर उतऊन डान्सबार बंद करतील, असा इशारा त्यांनी दिला.