कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोडामार्ग चेकनाक्यावर पर्यटकांची लूट

12:56 PM Nov 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अॅड. संतोष मळवीकर यांच्याकडून पर्दाफाश : अधीक्षकांकडून तीन पोलिसांची चौकशी सुरु

Advertisement

पणजी : गोवा दोडामार्ग चेकनाक्यावर पर्यटकांची लूट करणाऱ्या पोलिसांना शेरास सव्वाशेर भेटला आणि चेक नाक्यावरील पोलिसांचा पर्दाफाश झाला. नंतर त्याने गुरुवारी रितसर तक्रार दाखल करून पणजीत पत्रकार परिषद घेतली आणि सारा प्रकार पत्रकारांना सांगितला. दोडामार्ग चेकनाक्यावर पर्यटकांकडून पावती न देता पैसे घेणाऱ्या तीन पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी अॅड. संतोष मळवीकर यांनी केली आहे. या नाक्यावरील पोलिस पर्यटकांना लुबाडत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. काल गुरुवारी येथील आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. संतोष मळवीकर एकंदर प्रकाराचा भांडाफोड केला. तत्पूर्वी त्यांनी पैसे घेणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

पाचशे उकळले, पावती नाही दिली

मळवीकर यांनी माहिती दिली की, रविवारी दुपारी आम्ही दोडामार्ग येथून गोव्यात प्रवेश केला असता नाक्यावरील पोलिसांनी आम्हाला अडवले. आपल्याकडे गाडीची सर्व कागदपत्रे होती. मात्र वाहन परवाना नव्हता. मी माझी चूक मान्य करून दंड भरण्याचे ठरवले. पोलिसांनी माझ्याकडून पाचशे ऊपये घेतले. मात्र, पावती मागितली असता ती मिळणार नाही असे सांगण्यात आले.

कर्नाटकच्या पर्यटकांना केली मारहाण 

मळवीकर यांनी पुढे सांगितले की हा सारा प्रकार घडत असताना पोलिसांनी नेमप्लेट देखील लावली नव्हती. त्याच दिवशी रात्री आठ वाजता या मार्गाने आम्ही गोव्यातून बाहेर पडत होतो. त्यावेळी पोलिसांनी कर्नाटकचे एक वाहन अडवले होते. पोलिसांनी वाहनांमधील व्यक्तींना मारहाण देखील केली. या दोन्ही घटना आम्ही रेकॉर्ड केल्या आहेत.

पणजी पोलिसांना देणार पुरावे

आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही पणजी पोलिसांना देणार आहोत. गोवा पोलिस अधिकाऱ्यांनी अशा पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे. गोव्यातील विदेशी पर्यटक कमी होत आहेत. पोलिसांतर्फे देशी पर्यटकांनाही असा त्रास दिला जात आहे, हे प्रकार बंद झाले पाहिजेत, असे मळवीकर यांनी सांगितले.

डिचोली जाण्यास पोलिस एका पायावर असतात तयार

गोवा दोडामार्ग येथील चेक नाक्यावर देशी पर्यटकांची सर्रासपणे लूट केली जाते, मात्र या पोलिसांवर कधीही कारवाई होत नाही. त्यामुळे अनेक पोलिस कर्मचारी बदली होऊन डिचोली पोलिसस्थानकात जाण्यास एका पायावर तयार असतात. नंतर दोडामार्ग चेक नाक्यावर ड्युटी कशी मिळेल याच्यासाठी खटाटोप करत असतात. पर्यटकही पोलिसांच्या पैसे घेण्याच्या कृत्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. उगाच कटकट नको म्हणून पैसे देऊन मोकळे होतात.

दोडामार्गातील त्या तीन पोलिसांची चौकशी सुरु

दोडामार्ग येथे घडलेल्या लुटीच्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल होताच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी या घटनेची दखल घेऊन चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. नंतर डिचोली उपविभागीय अधिकारी श्रीदेवी यांनी त्या तीन पोलिसांना डिचोली कार्यालयात बोलावून घेतले आणि चौकशीला सुऊवात केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article