For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वर्षा पर्यटनासाठी राधानगरी अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंद! वनकर्मचाऱ्यांचा बंदोबस्त :

06:47 PM Jul 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
वर्षा पर्यटनासाठी राधानगरी अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंद  वनकर्मचाऱ्यांचा बंदोबस्त
Advertisement

अभयारण्यात प्रतिबंधित क्षेत्रात, अपघात प्रवणक्षेत्रात पर्यटनास प्रवेश बंद : वन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त : विभागीय वनधिकारी  (वन्यजीव) श्रीकांत पवार यांची माहिती

राधानगरी प्रतिनिधी

राधानगरी अभयारण्यात ठिकठिकाणी पावसामुळे धबधबे प्रवाहित होत असतात. त्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. अचानकपणे होणाऱ्या नैसगिक आपत्तीमुळे सुध्दा पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच हसणे डॅम परिसरात अजूनही हत्तीचा वावर असल्याने या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने राधानगरी अभयारण्यात प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटन करण्यास प्रवेश बंद करण्यात आलेला आहे.

Advertisement

पर्यटन करताना काही पर्यटक पावसाळयामध्ये निसरड्या झालेल्या वाटांवर जात असतात. तेथे अपघाताचा धोका, तसेच मद्य पिऊन मौज मजा करणे, पर्यटन ठिकाणी कचरा करणे, बाटल्या टाकणे, धबधब्याच्या ठिकाणी असणाऱ्या धोकादायक उंच कड्यावरुन स्वत:हून पाण्यामध्ये उड्या टाकणे, वनक्षेत्रात प्रवेश करणे, वन्यप्राण्यांना इजा होईल, अशी कृती करणे, वाहने भरधाव चालवणे, मोठ्याने आरडाओरड, चुली पेटवून जेवण करणे, अशा कृत्यामुळे पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अचानक होणाऱ्या नैसगिक आपत्तीमुळे सुध्दा पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हसणे डॅम परिसरात अजूनही हत्तीचा वावर असल्याने येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

राधानगरी अभयारण्यात प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटनास प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. अभयारण्यातील वर्षा ऋतूतील आल्हाददायक परिसर व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. पण राधानगरी अभयारण्यात असलेल्या पर्यटनस्थळी जेथे परवानगी नाही अशा प्रतिबंधित क्षेत्रात कोणीही विनापरवाना प्रवेश करणार नाही. त्यासाठी पर्यटनस्थळी जाणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावून वनकर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement

विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) च्यावतीने सर्व पर्यटकांना राधानगरी अभयारण्यात वर्षा पर्यटनावेळी नियमाचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे तसेच परवानगीशिवाय अवैधरित्या अभयारण्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये विनापरवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.