शाळेचे गेट अंगावर पडून विद्यार्थ्यांचा दुदैर्वी मृत्यू
केर्ले गावातील घटना
कोल्हापूर :
जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले गावात शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर गेट पडून दूर्दैवी मृत्यू झाला. केर्ले येथील कुमार व कन्या विद्यामंदीर या शाळेत इयत्ता सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दिपकराज माने या विद्यार्थ्याच्या अंगावर हे गेट पडले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्वरूप लघुशंकेसाठी जात असताना शाळेचे गेट त्यांच्या अंगावर पडले. त्याला वेळीच कोल्हापूरच्या सी.पी. आर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला.
स्वरुप नेहमीप्रमाणे शाळेला आला. हजेरी झाल्यावर लघुशंकेला जातो असे सांगून तो बाहेर गेला. शालेय कामकाज चालु असताना अचानक शेजारच्या मावशींचा मुलगा सांगत आला गेट पडल्याचे, म्हणून आम्ही तिथे गेलो असताना गेटच्या खाली विद्यार्थी पडल्याचे आम्हाला सुरुवातीला दिसले नाही. नंतर गेटच्या खाली विद्यार्थी पडलेला दिसला, त्याच्या कपाळावर गेट होते आणि रक्तप्रवाह चालू होता. त्याला लगेचच गाडीतून गावातील डॉ. किडगावकर यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी नेले. त्यांच्या सल्ल्यानुसार कोल्हापूरला आणले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले, अशी माहिती स्वरुपच्या वर्गशिक्षकांनी माध्यमांना दिली.