महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पर्यटन गोव्यात अन् वास्तव्य कारवारात

10:31 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सलग तीन दिवस सुटी पर्यटकांच्या पथ्यावर : कारवार जिल्ह्यातील समुद्र किनारे गजबजले

Advertisement

कारवार : नाताळाची सुटी आणि नववर्षाचे स्वागत गोव्यातच केले पाहिजे, ही भावना बळावत चालल्याने कारवारमार्गे गोव्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गोव्यात कर्नाटकासह केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जागतिक पर्यटक दाखल होत असतात. त्यामुळे गोव्यातील हॉटेल आणि लॉजिंगचे दर वाढलेले असतात. वाढलेले दर सर्वसामान्य पर्यटकांना परवडत नसतात. इतकेच नव्हे तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोव्यात लॉजिंग मिळणे कठीण होऊन गेलेले असते. लॉजिंगच्या समस्येवर पर्यटकांनी पर्यायी मार्ग शोधून काढला आहे. गोव्याच्या सीमेपासून कारवार शहर केवळ 12 ते 13 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे काही पर्यटक कारवार येथील लॉजिंगमध्ये राहणे पसंत करतात. संपूर्ण दिवसभर गोव्यात पर्यटनाचा आनंद लुटायचा आणि विश्रांतीसाठी कारवारमध्ये दाखल व्हायचे, असे अनेक वर्षापासून घडत आहे. गोव्याच्या तुलनेत कारवारमधील हॉटेलचे आणि लॉजिंगचे दर कमी असल्याने पर्यटक विशेष करून कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागातील पर्यटक कारवारला पहिली पसंती देतात. येथील काही हॉटेलमध्ये उत्तम प्रतीचे सी फूड मिळत असल्याने पर्यटक समाधानी होतात. अलीकडच्या काळात लॉजिंगचे बुकींग ऑनलाईनद्वारे होत असल्याने येथील हॉटेलसमोर हाऊसफुल्लचे फलक झळकत आहेत. पर्यटन गोव्यात आणि वास्तव्य गोव्यात या संकल्पनेमुळे कारवार जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article