For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची केंद्रीय पर्यटनमंत्र्यांशी चर्चा

12:57 PM Jun 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची केंद्रीय पर्यटनमंत्र्यांशी चर्चा
Advertisement

पर्यटन, सांस्कृतिक प्रोत्साहनावर दिला भर : विमान वाहतूकमंत्र्यांचीही घेतली भेट

Advertisement

पणजी : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेतली. या भेटीत खंवटे यांनी गोव्याच्या पर्यटन विकासासाठी सहयोगी धोरणे विकसित करण्याभोवती चर्चा केली. याशिवाय पायाभूत सुविधा, सांस्कृतिक प्रोत्साहन आणि विमान वाहतूक कनेक्टिव्हिटीवरही भर देण्यात आला.   दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्याला प्रामाणिक आणि उच्च-मूल्याच्या पर्यटनाचे केंद्र म्हणून स्थान देण्यासाठी गोव्याचा वारसा, उत्सव आणि आध्यात्मिक संपत्तीचा वापर करण्यास प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. गोव्याची ओळख प्रतिबिंबित करणाऱ्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे महत्त्व, यावर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत गोव्याला आंतरराष्ट्रीय थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्याची आणि देशांतर्गत मार्गांची व्यवहार्यता सुधारण्याची महत्त्वाची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मंत्री खंवटे यांनी देशांतर्गत गोव्याला जोडणारे हवाई मार्ग व आर्थिक व्यवहार्यता याबाबत सखोल चर्चा झाली. प्रमुख बाजारपेठांमधून गोव्याला आंतरराष्ट्रीय थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्याबाबत महत्त्व पटवून दिले. वर्षभर गोव्यात पर्यटकांचा ओघ सुनिश्चित करण्यासाठी विमान कंपन्यांच्या किंमती संरचनांचे पुनर्परीक्षण करण्याची गरज केंद्रीय मंत्र्यांसमोर अधोरेखित केली. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेतल्यानंतर रोहन खंवटे यांच्यासमवेत गोवा पर्यटन खात्याचे सचिव संजीव आहुजा, विशेष अधिकारी शॉन मेंडिस उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.