महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी-धारवाड शहरात महसूल, भूमापन अधिकाऱ्यांचा फेरफटका

11:09 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘वक्फ’ची मालमत्ता शोधण्याचा प्रयत्न? जनतेत असंतोष

Advertisement

बेळगाव : वक्फची मालमत्ता या विचारातून राज्य सरकार एकीकडे शेतकऱ्यांना नोटीस पाठवत आहे. यामुळे नैराश्येतून शेतकरी मोर्चा, आंदोलने करून आपल्याला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. उताऱ्यामधील वक्फ हा शब्द असल्याची खातरजमा चालवलेली असताना आता महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हुबळी शहरात वक्फच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करीत असल्याचे समजून येते. शेतकऱ्यांना दिलेली नोटीस मागे घेऊन आता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या उताऱ्यात मालकी या रकान्यात वक्फ हा शब्द वगळण्यासाठी सांगत आहे. पण हुबळीमध्ये महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी चालविलेली हालचाल ही नेमकी जनतेच्या विरोधाला कारणीभूत ठरत आहे.

Advertisement

हुबळी-धारवाड शहरात महापालिकेच्या महसूल अधिकाऱ्यांनी गुरुवारपासून फेरफटका चालविला आहे. सरकारच्या निर्देशानुसार टाऊन प्लॅनिंग, हातनकाशे व काही मालमत्ता या वक्फ बोर्डाच्या असाव्यात का? याची शहानिशा करीत आहेत. अशाप्रकारचे महसूल अधिकाऱ्यांचे कामकाज केवळ हुबळी-धारवाड शहरांपुरते मर्यादित नाही तर राज्यभरातून चालले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार बुधवारपासूनच वक्फची जमीन शोधणे, सर्व्हे करणे या प्रकारचे काम महसूल आणि भूमापन खात्याच्या अधिकाऱ्यांनी चालविले असून यामुळे जनतेत मात्र चिंतेचे वातावरण आहे. बुधवारी हुबळीच्या आनंदनगर, टिपूनगरसह जुनी हुबळी येथील काही भागात अधिकाऱ्यांनी फेटफटका मारला. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाला सुरुवात केली.

घंटीकेरी, भेंडीगेरी, गणेशपेठ, दुर्गदबयलू, मध्यवर्ती बसस्थानक परिसराची पाहणी करून वक्फची मालमत्ता शोधण्याचा कयास केल्याचे वृत्त आहे. एकीकडे शेतकऱ्यांना दिलेली नोटीस मागे घेण्याचे नाटक करणारे सरकार दुसरीकडे शहर भागातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून वक्फ मालमत्तेला आश्रयाचे स्थान देत असल्याचे दिसून येत असून यातून राज्य सरकारला नेमके काय साधायचे आहे? हेच जनतेला समजेनासे झाले आहे. महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सध्या चालविलेले सर्वेक्षण हे वक्फच्या नावाने केल्यास राज्यभरातून असंतोषाचा भडका उडेल व होणाऱ्या दुष्परिणामाला सरकारला जबाबदार व्हावे लागणार आहे, यात संशय नाही.

हुबळी येथे शेतकऱ्यांकडून अहवाल स्वीकारण्याचे काम

केंद्र सरकारने वक्फ बोर्डच्या कायद्यात दुरुस्ती करण्याचा मसुदा तयार करण्यास पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डचे दुरुस्ती विधेयकाचे संसदीय संयुक्त समिती अध्यक्ष हुबळी येथे दाखल होऊन शेतकऱ्यांकडून अहवाल स्वीकारत आहेत. प्रगतशील शेतकरी व विचारवंतांनी सभा घेऊन चर्चा चालवली आहे. अशाप्रसंगी महापालिकेचे अधिकारी राज्य सरकारच्या सूचनेनुसार शहर व उपनगरांचा फेरफटका मारून वक्फच्या मालमत्तेची नोंद घेत असून हा विरोधाभास आहे.

भूमापन खात्याचे अधिकारी जनतेच्या प्रश्नावर निरुत्तर

वक्फची मालमत्ता शोधण्यासाठी हुबळी शहराची प्रदक्षिणा घालणारे महसूल व भूमापन खात्याच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नाला निरुत्तर व्हावे लागत आहे. सर्वेक्षण कशाचे करीत आहात? असे जनतेपैकी कोणी विचारले तरी नेमके उत्तर काय द्यावे? हेच अधिकाऱ्यांना समजेनासे झाले आहे. स्मार्टसिटीचा सर्व्हे करीत आहोत, असे थातुरमातुर उत्तर देऊन जनतेची बोळवण करण्याचे अधिकाऱ्यांनी चालविले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article