बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेत सेन, सिंधूची खडतर परीक्षा
वृत्तसंस्था/ पॅरिस
आज सोमवारपासून येथे सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय शटलर्स कठोर परीक्षेसाठी सज्ज होत असताना लक्ष्य सेनला अव्वल मानांकित शी यू क्यूविऊद्ध कठीण सलामीचा सामना करावा लागेल, तर माजी विजेती पी. व्ही. सिंधू खराब कामगिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल.
दुखापती आणि सातत्यहीन फॉर्ममुळे तयारीत अडथळे येऊन भारताच्या आघाडीच्या खेळाडूंसाठी हे वर्ष कठीण गेले आहे. 21 व्या क्रमांकावर असलेला सेन ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर एका वर्षानंतर फ्रेंच राजधानीत परतत आहे. 2021 च्या आवृत्तीत कांस्यपदक जिंकणारा हा 24 वर्षीय खेळाडू तेव्हापासून संघर्ष करत आला आहे. 2024 मध्ये ऑल इंग्लंडमध्ये त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली.
सेन अनेकदा ली शी फेंग, कोडाई नारोका आणि शी यांच्याविऊद्धच्या कठीण सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. शी याच्याविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी 1-3 अशी आहे. या हंगामात तीन सुपर 1000 जेतेपदांसह जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या चीनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या शी यू क्यूने या वर्षाच्या सुऊवातीला इंडोनेशियामध्ये झालेल्या सामन्यात सेनचा तीन गेम्समध्ये पराभव केला होता.
महिला एकेरीत दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती आणि 2019 ची विश्वविजेती सिंधूला चीन ओपनमध्ये उन्नती हुडाविऊद्ध झालेल्या धक्कादायक पराभवातून सावरावे लागेल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पाच पदकांसह सर्वांत यशस्वी भारतीय असलेली सिंधू तिच्या मोहिमेची सुऊवात बल्गेरियाच्या कालोयाना नालबंटोवाविऊद्ध करेल. सिंधूने या हंगामात निराशा अनुभवली आहे. इंडिया ओपनमध्ये तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती आणि हा तिचा सर्वोत्तम निकाल होता. 15 व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूची गाठ उपउपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांग झी यीशी पडू शकते.
2023 च्या आवृत्तीत कांस्यपदक जिंकणारा प्रणॉय फिनलंडच्या जोआकिम ओल्डॉर्फविरुद्ध सुरुवात करेल, परंतु जागतिक क्रमवारीत 34 व्या क्रमांकावर असलेल्या या भारतीय खेळाडूचा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या अँडर्स अँटोनसेनशी दुसऱ्या फेरीत सामना होऊ शकतो. चायना ओपनमध्ये चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनकडून झालेल्या तीन गेम्सच्या पराभवादरम्यान प्रणॉयने आपली लढाऊ वृत्ती दाखविली होती. परंतु अडथळे पार करण्यासाठी आणि स्पर्धेत मुसंडी मारण्यासाठी त्याला त्या महत्त्वाच्या क्षणी आपले पारडे भारी बनवावे लागेल.
पुरुष दुहेरीचे नेतृत्व करणाऱ्या नवव्या मानांकित सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे आणि ते दुसऱ्या फेरीत हरिहरन अम्साकाऊनन आणि ऊबेन कुमार किंवा चिनी तैपेईचे लिऊ कुआंग हेंग आणि यांग पो हान यांच्याविरुद्ध खेळतील. उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या लिआंग वेई केंग आणि वांग चांग यांच्याविऊद्ध एक कठीण सामना त्यांना खेळावा लागू शकतो. चिनी जोडीची त्यांच्याविरुद्धची कामगिरी 6-2 अशी आहे. जर त्यांनी तो अडथळा पार केला, तर आशियाई क्रीडास्पर्धेतील विजेते मलेशियाचे आरोन चिया आणि सोह वूई यिक त्यांना भेटू शकतात. या जोडीनेच त्यांना पॅरिस ऑलिंपिकच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर काढले होते आणि त्यांच्याविरुद्धची कामगिरी लक्षात घेता मलेशियन जोडी 11-3 अशी आघाडीवर आहे.
याशिवाय मिश्र दुहेरीत 16 व्या मानांकित ध्रुव कपिला आणि तनीषा क्रास्टो यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे, तर रोहन कपूर आणि ऋत्विका शिवानी ग•s मकावच्या लिओंग लोक चोंग आणि वेंग ची एनजीचा सलामीला सामना करतील. महिला दुहेरीत प्रिया कोंजेंगबम-श्रुती मिश्रा आणि पांडा बहिणी (ऋतुपर्णा आणि श्वेतापर्णा) रिंगणात आहेत.