कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय बॅडमिंटनपटूंसाठी कठीण ड्रॉ

06:13 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हायलो खुली सुपर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

Advertisement

वृत्तसंस्था / सारब्रुकेन (जर्मनी)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या 475,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या हायलो खुल्या सुपर 500  आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना कठीण ड्रॉ ला सामोरे जावे लागणार आहे. या स्पर्धेचा ड्रॉ नुकताच काढण्यात आला.

पुरूष एकेरीमध्ये भारताच्या लक्ष्य सेनला पहिल्याच फेरीत फ्रान्सच्या पाचव्या मानांकीत ख्रिस्टो पोपोव्हशी लढत द्यावी लागणार आहे. 2021 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या लक्ष्य सेनने अलिकडेच झालेल्या हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पुरूष एकेरीच्या काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारताचा आयुष शेट्टी याचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या व्हिक्टर लेई बरोबर होणार आहे. आयुष शेट्टीने अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळ्रवले होते. भारताचा माजी टॉपसिडेड किदांबी श्रीकांतला पहिल्या फेरीत आपल्याच देशाच्या किरण जॉर्जशी लढत द्यावी लागेल. चालु वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत श्रीकांतने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. भारताच्या एस. शंकर मुथूसॅमी सुब्रमणीयनचा सलामीचा सामना मलेशियाच्या लियाँग हेओशी तर तरुण मणिपलीचा सलामीचा सामना इंडोनेशियाच्या द्वितीय मानांकीत जोनातेन ख्रिस्टीशी होईल.

महिला एकेरीच्या काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये भारताच्या अनमोल खर्बला पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या ज्युली जेकॉबसनशी तर उन्नती हुडाला पहिल्या फेरीत ब्राझीलच्या ज्युलीयाना व्हियेराशी लढत द्यावी लागेल. चालु महिन्याच्या प्रारंभी झालेल्या आर्किटीक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अनमोल खर्बने उपांत्य फेरी गाठली होती. तर उन्नती हुडाने 2022 च्या ओदीशा मास्टर्स तसेच 2023 च्या अबुधाबी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले हेते. महिला एकेरीच्या ड्रॉनुसार भारताच्या अनुपमा उपाध्यायला पहिल्या फेरीत युक्रेनच्या पोलिना बुरोव्हाशी, रक्षिता श्रीसंतोष रामराजला पहिल्या फेरीत स्पेनच्या क्लेरा अझुरमेंडीशी, श्रीयांशी वल्लीशेट्टीचा पहिल्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या तृतिय मानांकीत लिने केजरफेल्टशी त्याचप्रमाणे आकर्षी काश्यपचा पहिल्या फेरीतील सामना तुर्कीच्या अॅरिनशी, तान्या हेमंतचा पहिल्या फेरीतील सामना चीन तैपेईच्या लीन ती बरोबर होणार आहे. या स्पर्धेत पुरूष दुहेरीत भारताची अव्वल जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे आता पृथ्वी रॉय व साई प्रतिक यांचा पुरूष दुहेरीतील सलामीचा सामना फ्रान्सच्या ख्रिस्टो आणि टोमा पोपोव्हशी, मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन कपूर आणि ऋत्विका ग•s यांचा सलामीचा सामना कॅनडाच्या जोनातेन लेई व क्रिस्टल लेई यांच्याशी होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article