महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंचायत पोटनिवडणुकीसाठी एकूण 35 अर्ज दाखल

12:22 PM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बाणावली जि. पं. साठी चौघे इच्छुक : 23 रोजी मतदान, 24 रोजी मतमोजणी

Advertisement

पणजी : दहा ग्रामपंचायती आणि एक जिल्हा पंचायत यांच्या पोटनिवडणुकीसाठी काल बुधवारी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 39 अर्ज दाखल झाले आहेत. पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सुकूर (प्रभाग 10), कुडणे (प्रभाग 2), शेल्डे (प्रभाग 2), कुंडई (प्रभाग 7), केरी (प्रभाग 3), वळवई (प्रभाग 2), बोरी (प्रभाग 11), असोळणे (प्रभाग 1), राशोल (प्रभाग 5) आणि सुरावली (प्रभाग 2) यांचा समावेश आहे. जिल्हा पंचायतीमध्ये बाणावली मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. वरीलपैकी सुकूर पंचायतीसाठी 7, कुडणेसाठी 2, शेल्डे 4, कुंडई 4, केरी 4, वळवई 4, बोरी 3, असोळणे 3, राशोल 2 आणि सुरावली 2 आदी मिळून एकूण 35 अर्ज दाखल झाले आहेत. बाणावली जिल्हा पंचायतीसाठी 4 अर्ज प्राप्त झाले आहेत. बाणावली, वार्का, ओर्ली, कासावली आणि कार्मोणा आदी ग्रामपंचायतींचा समावेश असलेला हा मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आज दि. 13 रोजी अर्जांची छाननी होणार असून उद्या दि. 14 रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लगेचच अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. त्यापुढील आठवडाभर प्रचारासाठी मिळणार असून दि. 23 जून रोजी सकाळी 8 ते सायं. 5 पर्यंत मतदान होईल. दि. 24 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article