Sangli Crime | दिघंचीत विवाहितेचा छळ ; सासरच्या लोकांवर गुन्हा
वडापाव व्यवसायासाठी पैशांची मागणी; महिलेला मानसिक–शारीरिक छळ
आटपाडी : माहेरहून बडापावचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाख रूपये आणावेत, अशी मागणी करत विविध कारणावरून मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. दिघंची येथील गौरी रोहित लोखंडे (२३) हिने पोलीसात फिर्याद दिली आहे.
दिघंचीतील गौरी लोखंडेच्या फिर्यादीवरून रोहित महादेव लोखंडे, महादेव विठ्ठल लोखंडे, लक्ष्मी महादेव लोखंडे (रा. दिघंची) आणि ज्ञानेश्वरी आकाश भोसले (पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सासरच्या लोकांनी छळवणुक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सासरच्या मंडळींनी संगणमत करुन चारित्र्यावर संशय घेवुन, तसेच नवऱ्याला वडापावचा व्यवसाय सुरु करणेसाठी दहा लाख रुपये घेवुन ये अशा कारणावरुन गौरीला शिवीगाळ करुन, मारहाण केली.
तिचे मंगळसुत्र व कानातले पती रोहित लोखंडे याने ठेवुन घेतले व तिला माहेरी पाठवले. तसेच तिच्या पतीने फोन पे वरुन गौरीच्या बँक खात्यावरुन दोन लाख रूपये काढुन घेतले व परत देतो असे सांगुन परत दिले नाहीत. तिचा मानसिक, शारिरीक व आर्थिक छळ केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.