Miraj Crime : पद्माळेत प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन कुटुंबात मारामारी
मिरज तालुक्यात कौटुंबिक वादाला हिंसक वळण
सांगली : लग्नाच्या कारणावरुन मिरज तालुक्यातील पद्माळे येथील जगदाळे आणि कोळी या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये सात जण जखमी झाले असून अकरा जणांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनही कुटुंबाकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.
रुपाली सुरेश कोळी (रा. पद्माळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे दिर मोहन कोळी, प्रकाश कोळी, पुतण्या किरण कोळी आणि सागर कोळी हे जखमी झाले. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित दिगंबर दिनकर जगदाळे, संजय श शिकांतजगदाळे, नाथाउर्फ आदिना थ मल्हारी जगदाळे, रोहित बबन जगदाळे, विजय शशिकांत जगदाळेआणि बंडू उर्फ आदित्य आदिनाथ जगदाळे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
फिर्यादी रुपाली कोळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा पुतण्या आकाश कोळी याने संशयित दिगंबर जगदाळे यांची चुलत बहिण शिवानी सुनील जगदाळे हिच्याशी लग्र केले होते. याचा राग दिगंबर यास होता. सोमवारी पुतण्या सागर कोळी याच्या घरासमोर संशयित आले. त्यांनी घरात घुसून सदस्यांना मारहाण केली. फिर्यादी रुपाली तसेच त्यांची जाऊ रेखा आणि सुवर्णा यांना मारहाण केली.
दरम्यान जयश्री जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोहन कोळी, सागर कोळी, किरण कोळी, प्रकाश कोळी आणि गजानन कोळी यांच्यावर गुन्हा दाखल केला. संशयितांनी केलेल्या मारहाणीत जयश्री जगदाळे, वैशाली जगदाळे, छाया जगदाळे जखमी झाल्या.