For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंजली सिमवाल, वीर छोत्रानी यांना टॉप सिडिंग

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंजली सिमवाल  वीर छोत्रानी यांना टॉप सिडिंग
Advertisement

मुंबई : येथे 20 जुलैपसून सुरू होणाऱ्या 47 व्या महाराष्ट्र राज्य खुल्या पुरूष आणि महिलांच्या स्क्वॅश स्पर्धेत वीर छोत्रानी आणि अंजली सिमवाल यांना अनुक्रमे पुरूष आणि महिलांच्या मानांकनात टॉपसिडींग देण्यात आले आहे. पुरूषांच्या विभागात राहुल बैताला दुसरे तर महेश माणगावकर आणि ओम सीमवाल यांना अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मानांकनात मिळाले आहे. महिलांच्या विभागात अंजली सिमवालला पहिले स्थान, सुनिता पटेलला दुसरे तसेच आराध्या पोरवाल व राणी गुप्ता यांना अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान मिळाले आहे. मुलांच्या 19 वर्षांखालील वयोगटामध्ये राहुल बैताला अग्रस्थान तसेच मुलींच्या विभागात रिवा निंबाळकरला अग्रस्थान मिळाले आहे. मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटात दर्शिल परसरामपुरीयाला पहिले स्थान, इशान दबकेला दुसरे स्थान मिळाले आहे. मुलींच्या विभागात रुद्रा सिंगला पहिले तर करिना फिप्सला दुसरे स्थान देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.