महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात उद्या सार्वजनिक सुट्टी

06:25 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 22 जानेवारी रोजी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात सरकारी खाती, शाळांसह सर्वच बँका व इतर आस्थापनांना सुट्टी देण्यात आली आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याखाली  हा नवा आदेश जारी करण्यात आला आहे.

Advertisement

सामान्य प्रशासन खात्याने जारी केलेल्या आदेशानुसार, उत्तर प्रदेश येथे अयोध्येत श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा 1881’ च्या कलम 25 नुसार सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी 17 जानेवारी रोजी केवळ सरकारी कार्यालये आणि शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यात सुधारणार करणारा नवीन आदेश काल जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या दिवशी अर्ध्या दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. त्या दिवशी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत सरकारी कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. यासंदर्भातील आदेश दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने जारी केला आहे. तत्पूर्वी छत्तीसगड, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यापाठोपाठ काल गोवा सरकारनेही सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article