टॉयलेट सीटला 107 कोटीची किंमत
18 कॅरेट सोन्याने निर्मित
हे जग स्वत:च्या चित्रविचित्र छंदासाठी ओळखले जाते. सध्या एका टॉयलेट सीटची चर्चा हो आहे. याला गोल्डन टॉयलेट म्हटले जात आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा अनोख्या कलाकृतीने लोकांना थक्क करून सोडले आहे. मॉरिजियो कॅटलन या कलाकाराची ही कलाकृती असून त्यांनी यापूर्वी भिंतीवर केळ्याला टेप करत जगभरात प्रसिद्धी मिळविली होती.
या कलाकाराने 18 कॅरेट सोन्याने निर्मित केलेली ही टॉयलेट सीट लिलावात जवळपास 107 कोटी रुपयांमध्ये विकली गेली आहे. हे टॉयलेट केवळ किंमतीत नव्हे तर वजनातही चकित करणारे आहे. याचे वजन सुमारे 101 किलो आहे. या चमकदार टॉयलेटला ‘अमेरिका’ नाव देण्यात आले आहे. लिलावात याची प्रारंभिक बोलीच 10 दशलक्ष डॉलर्स ठेवण्यात आली होती.
का आहे खास
हा केवळ टॉयलेट नसून सोन्याने निर्मित एक चमकदार कलाकृती आहे. याच्या निर्मितीत 101 किलोपेक्षा अधिक सोने वापरण्यात आले आहे. सद्यकाळातील मूल्यानुसार केवळ सोन्याचीच किंमत जवळपास 10 दशलक्ष डॉलर्स आहे. याचमुळे याला कलेच्या जगतात एक अनोखी रचना मानण्यात येत आहे.
ही अनोखी कलाकृती रिप्लीज बिलीव इट ऑर नॉटकडे पोहोचली आहे. ही संस्था जगातील विचित्र आणि चकित करणाऱ्या गोष्टी स्वत:च्या संग्रहात बाळगते. आमच्या इतिहासातील ही सर्वात अनोखी खरेदी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मूल्यवान आणि सर्वात चमकदार वस्तू आहे, जी आमच्या संग्रहात सामील झाली आहे. जर या टॉयलेटला वितळविले तर केवळ सोन्याची किंमतच जवळपास 10 दशलक्ष डॉलर्स होईल असे रिप्लीजच्या प्रवक्त्या सुजेन स्मागाला पॉट्स यांनी सांगितले आहे.