For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘तोयबा’चे तीन हस्तक बारामुल्लामध्ये जेरबंद; दारूगोळ्यासह मोठी रोकडही जप्त

06:44 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘तोयबा’चे तीन हस्तक बारामुल्लामध्ये जेरबंद  दारूगोळ्यासह मोठी रोकडही जप्त
Advertisement

चिनी ग्रेनेडसह अडीच लाखांची रोकड जप्त

Advertisement

वृत्तसंस्था/ उरी

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिह्यातील उरी येथे झुला फूटब्रिजजवळ सुरक्षा दलांनी संयुक्त नाका तपासणीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडले आहे. झडतीदरम्यान त्यांच्याकडून 3 चायनीज ग्रेनेड आणि अडीच लाख ऊपयांची रोकडही जप्त करण्यात आली. याप्रकरणी उरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या तीन हस्तकांना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून दारूगोळ्यासह मोठी रोकडही जप्त करण्यात आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील कलगई येथील झुला पुलाजवळ तपासणी आणि गस्त घालत असताना सुरक्षा दलांनी कमलकोटहून राष्ट्रीय महामार्गाकडे बॅग घेऊन येणाऱ्या संशयित व्यक्तींना अडवत ही कारवाई केली आहे. जमीर अहमद खांडे आणि मोहम्मद नसीम खांडे अशी दोन संशयितांची नावे असून ते मादियान कमलकोटचे रहिवासी आहेत. झडतीदरम्यान त्यांच्याकडून तीन चिनी बनावटीचे हँडग्रेनेड आणि अडीच लाख ऊपये रोख जप्त करण्यात आले. त्यानंतर चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी मंजूर अहमद भाटी नावाच्या व्यक्तीकडून दहशतवादी हल्ला करण्यासाठी रोख रक्कम घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार भाटीलाही ताब्यात घेण्यात आले. भाटीलाही अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. अटक केलेले आरोपी दहशतवाद्यांचे सहकारी म्हणून काम करत होते आणि ते लष्कर-ए-तोयबा/द रेझिस्टन्स फ्रंट या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचेही सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.