For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:08 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 19 ते मंगळवार दि. 25 जून पर्यंत

Advertisement

आयुर्वेद आणि वैदिक ज्योतिष हे दोन्ही शब्द जर बघितले तर यामध्ये वेद  हा शब्द कॉमन आहे. आद्य, मध्य आणि अंत्य नाड्यांचा संबंध वात, पित्त आणि कफ या दोषांशी  निगडित आहे किंवा जोडले  गेलेला आहे अशी कन्सेप्ट आहे. मग आयुर्वेदाप्रमाणे या नाड्यांचे काम कसे चालते हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. मुळात समजून घ्या, की वात, पित्त आणि कफ हे बायोलॉजिकल ह्युमर आहेत. याचा अर्थ काय की जे दाखवता येत नाहीत पण लक्षणावरून ठरवले जातात. वात, पित्त आणि कफ यांचा जर योग्य संतुलित असतील तर ती व्यक्ती स्वस्थ  समजली जाते. आता हे तीन दोष, दोष का म्हणायचे, आणि यांचे ओरिजिन काय आहे हे बघू. आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार नवद्रव्य म्हणजे 9 इलेमेंट हे एटर्नल आहेत, इंटरनल म्हणजे चिरंजीवी. हे नऊ इलेमेंट्स म्हणजे आत्मा, पंचमहाभूते,  काळ, दशदिशा आणि चित्त. म्हणजे आयुर्वेदाचा सिद्धांत सांगतो की आत्मा हा कन्सिविंगच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला शुक्राणू अंड्यामध्ये प्रवेश करतो आणि  झायगोट तयार होतो, त्या वेळेला त्या त्या बीजामध्ये आत्मा प्रवेश करतो. आत्मा हा सिद्धांत आयुर्वेदाला मान्य आहे. कारण आयुर्वेद हे केवळ प्रत्यक्ष प्रमाणावर विश्वास ठेवत नाही. आयुर्वेदानुसार किंवा तर्कशास्त्र अनुसार प्रमाणाचे म्हणजे प्रूफचे (म्हणजे साबित करून दाखवण्याचे) चार प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष प्रमाण. दोन आप्त प्रमाण म्हणजे आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने प्रमाणित केलेले. तीन अनुमान म्हणजे अंदाज म्हणजे धूर असेल तर कुठेतरी अग्नी असायला हवा हा अनुमान झाला आणि चौथा म्हणजे युक्ती म्हणजे स्वत:च्या बुद्धीने अनालिसिस करून साबित करणे. तर आपला मुद्दा हा होता की वात, पित्त आणि कफ म्हणजे काय. आपण म्हणतो ना की कप प्रधान शरीर आहे, पित्त फार होते इत्यादीचा संबंध या वात, पित्त आणि कफ यांच्याशी आहे. आणि हे वात पित्त आणि कफ हे पंच महाभूतात मधून आलेले आहेत. म्हणजे बघा, वात हे वायू आणि आकाश यांच्या संयोगाने निर्माण होते. पित्त हे अग्नी आणि जल यांच्या संयोगाने होते. कफ हे जल आणि पृथ्वी यांच्या संयोगाने होते. यातही पंच वात, पंचपित्त  आणि पंच कफ अशी विभागणी आहे. वरील घटकांपैकी प्रत्येक घटक संततीसाठी आवश्यक आहे आणि संततीसाठी योग्य असलेले शुक्र (यामध्ये पुऊष शुक्र  आणि स्त्री शुक्र दोन्हीही आले) वात, पित्त आणि कफ यांच्या योग्य बॅलन्सने  साथ होते. ज्योतिष शास्त्रातील नाडी ही नक्षत्राची नाडी असते. आणि अष्टकुट मिलनामध्ये जी नाडी आपण पाहतो ती ज्या नक्षत्राची असते ते चंद्राचे नक्षत्र असते. चंद्रमा मनसो जायता हे ज्योतिषांनी लाख लाख वेळा वापरलेले सूत्र. म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणजे चंद्र हा शरीराचा कारक नाही. मग शरीराचा कारक कोण? तर जन्म झाला त्यावेळी पूर्व क्षितिजावरती उपस्थित असलेले राशी आणि त्या राशीमधील नक्षत्र. म्हणजे जन्म लग्न नक्षत्र हे माणसाच्या नाडीला जबाबदार आहे आणि इनडायरेक्टली वात, पित्त आणि कफ याला कारणीभूत आहे. मग चंद्राच्या नक्षत्रावरून जी नाडी बघितली जाते त्यावरून शरीराची प्रकृती कशी जोडू शकतात? विचार करण्यासाठी गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा हा की नाडीवरून संगती संतती होणार की नाही किंवा संगतीमध्ये काही डिफेक्ट असणार का त्याचा विचार करणे हे तितकेसे योग्य नाही, उलट मानसिक जडणघडण आणि मानसिक आरोग्याबद्दल नाडीचा विचार केला जाऊ शकतो असे म्हणणे जास्त योग्य ठरेल असे मला वाटते. म्हणून अष्टकूट मिलनामध्ये नाडीदोषाचा विचार कमीत कमी केला जावा, किंवा देश काल परिस्थितीनुसार ठरवावा. पण याचा संततीशी काही संबंध नाही हे निर्विवाद सत्य. वाचकांच्या सोयी करता नाडीचे टेबल देत आहे.

Advertisement

नाडी         नक्षत्र

आदि        आर्द्रा, अश्विनी, हस्त, ज्येष्ठ, मूल, पूर्वभद्र, पुनर्वसु, शताभिषा, उत्तराफाल्गुनी

मध्य        अनुराधा, भरणी, चित्रा, धनिष्ठा, मृग, पूर्वफाल्गुनी, पूर्वाषाढा, पुष्य,  उत्तराभाद्रपदा

अंत्या      आश्लेषा, कृतिका, मघा, रेवती, रोहिणी, श्र्रवण, स्वाती, उत्तराषाढा, विशाखा

मेष

परदेशवारीची शक्मयता आहे. किंवा तसा विचार तरी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे खर्च होईल. पण योग्य तेवढाच खर्च करा. वाहन जपून चालवा. निष्कारण कुणाशी वादावादीच्या भानगडीत पडू नका. बोलण्यात संयम ठेवा. व शांत रहा. स्वत:ला सांभाळा. कोर्ट केस चालू असेल तर निकालाला थोडा विलंब लागण्याची शक्मयता आहे. हा आठवडा आपल्याला सांभाळून व जपून रहायला सांगतो आहे.

उपाय:माऊतीची उपासना करा.

वृषभ

मन थोडे चंचल होण्याची शक्मयता आहे. मनाला आवर घाला. तब्येत चांगली राहील. आपल्या चांगल्या कार्याने नाव, सन्मान मिळेल. आपल्या जोडीदाराची देखील आपल्याला चांगली साथ मिळेल. जोडीदारावर विश्वास ठेवा. मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने अगर नोकरीच्या निमित्ताने दूरचे प्रवास घडण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला चांगला जाईल, असे वाटते.

उपाय: गुरुची आराधना करा.

मिथुन

आपल्या बुद्धिचातुर्याने या आठवड्यात आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपली छाप पाडाल. काहीवेळा आपल्या वाणीमध्ये ऊक्षपणा येण्याचा संभव आहे. तो तेवढा प्रयत्नाने टाळा. बाकी हा आठवडा आपल्याला चांगला जाईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होण्याची शक्मयता आहे. काही देवाण घेवाणीचे व्यवहार करणार असाल तर त्यात फायदा होण्याचीही शक्मयता आहे.

उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.

कर्क

संघर्षाशिवाय यश मिळत नाही, या उक्तीचा या आठवड्यात आपल्याला प्रत्यय येण्याची शक्मयता आहे. पण नातेवाईकांच्या व भावंडांच्या सहवासात आपला वेळ या आठवड्यात छान जाईल. आपल्या कामाचा आपल्या वरिष्ठावर चांगला प्रभाव पडण्याची शक्मयता आहे. मेजवानी मिळण्याची शक्यता आहे. छोट्या प्रवासाचा आनंद मिळण्याची देखील शक्मयता आहे.

उपाय: महादेवाची आराधना करा.

सिंह

वाहनसुख छान मिळेल. काही जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर तो पूर्ण होण्यास आणखी काही कालावधीची आवश्यकता लागण्याची शक्मयता आहे. किंवा घर खरेदी करणे अथवा बांधणे या बाबतीत सुद्धा आणखी काही कालावधीची आवश्यकता लागेल. कदाचित द्रव्यलाभ होण्याची शक्मयता आहे. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आणि स्वत:ची देखील काळजी घ्या.

उपाय: दर शनिवारी शनीला तेल वाहा.

कन्या

मुलांच्या अभ्यासात प्रगती झालेली दिसेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात पूर्णत्व आलेले दिसेल. ज्यांना लेखनाची आवड आहे त्यांना पण आपल्या लिखाणात बदल झालेला अथवा लिखाणाचा दर्जा वाढलेला दिसण्याची शक्यता आहे. आपली विचारशक्ती वाढलेली आपल्याला जाणवेल. लॉटरी वगैरे तत्सम प्रकारातून अचानक धनलाभाची शक्मयता आहे.

उपाय:दत्तगुरुंची उपासना करा.

तूळ

हा आठवडा आपल्याला भरपूर कष्ट करायला लावण्याची शक्मयता आहे. कष्ट करा पण स्वत:च्या तब्येतीला सांभाळून कष्ट करा. दुसऱ्यावर अति विश्वास ठेवू नका. विश्वासघात होण्याचा संभव आहे. आपल्या मौल्यवान वस्तू जपा. चोरापासून सावधान रहा. मन थोडे अस्वस्थ, चंचल राहील. नाना प्रकारच्या चिंता, शंका यांनी मन ग्रासून जाण्याची शक्मयता आहे. शांत रहा.

उपाय: कुलदेवतेची आराधना करा.

वृश्चिक

जोडीदाराचे सहकार्य चांगले व अपेक्षे पलीकडे मिळेल. स्वतंत्र व्यवसायात असाल तर आपली प्राप्ती चांगली होईल. भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदाराचेही सहकार्य चांगले मिळेल. एखाद्या प्रवासाला जाल. कोर्ट कचेरीची कामे असतील तर ती पूर्ण करण्यासाठी योग्य मार्ग मिळण्याचीही शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला उत्साहवर्धक जाईल.

उपाय: हनुमान चालीसाचा पाठ करा.

धनु

लॉटरीसारख्या प्रकारातून अचानक धनलाभ संभवतो. अथवा एखाद्या स्त्रीकडून द्रव्य लाभाची शक्मयता आहे. पण त्या द्रव्याची सत्यासत्यता पडताळून पाहूनच त्याचा स्वीकार करा. अन्यथा अडचणीत येण्याची शक्मयता असते. कोणत्या तरी मानसिक व्यथा आपल्याला सतावत राहतील. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. सांभाळून रहा. स्वत:चे नुकसान होऊ देऊ नका.

उपाय: दर सोमवारी शंकराला बेल वाहा.

मकर

हा आठवडा आपला धर्माचरणात जाण्याची शक्मयता आहे. पित्याचे व घरातील वृध्द मंडळींचे आपल्याला आशीर्वाद मिळण्याची शक्मयता आहे. संताच्या संगतीचा लाभ मिळण्याची शक्मयता आहे. कदाचित काही सूचक स्वप्ने पडतील. दूरचे प्रवास कदाचित तीर्थयात्रा वगैरे घडतील. वाचनाचा अगर लिखाणाचा नाद असेल तर एखाद्या ग्रंथाचे वाचन अथवा लेखन होईल.

उपाय:-मुक्या प्राण्यांना खायला द्या.

कुंभ

नोकरीत असाल तर थोड्या प्रयत्नाने पदोन्नती आणि पगारात वाढ मिळण्याची शक्मयता आहे. थोडे प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करावे लागतील. पित्याचे सहकार्य, त्यांचा आशीर्वाद मिळेल. त्यांच्या बरोबरच्या उद्योगात असाल तर त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्या. नक्की यश मिळेल. आपल्याला समाजात मानमरातबाप्रतिष्ठा मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय: शनीचा जप करा.

मीन

या आठवड्यात आपल्याला सर्व तऱ्हेचे लाभ मिळण्याचे संकेत आहेत. एखाद्या समारंभात सर्व नातेवाईकांच्या गाठी भेटी होतील. मन आनंदी राहील. राजकारणात असाल तर आपल्या कार्यात यश मिळण्याची शक्मयता आहे. उंची वस्तूंची खरेदी करण्याचा संभव आहे. किंवा निदान खरेदी करावीशी तरी वाटेल. एकूण हा आठवडा आपल्याला खूप आनंदात जाईल.

उपाय: घराबाहेर पडताना गंधाचा टिळा लावूनच बाहेर पडा.

Advertisement
Tags :

.