For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:10 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

अमावास्या नक्की कधी आहे, आज आहे की उद्या? या वेळेला नवरात्रात आठ दिवस कसे? एक दिवस कुठे गेला? नवमी आणि दशमी एकाच दिवशी कशी? दिवाळी नक्की 31 तारखेला की एक तारखेला? कोजागरी पौर्णिमा बुधवारी होती की गुऊवारी? वैष्णव एकादशी आणि स्मार्ट एकादशी दोन वेगवेगळ्या तारखेला कशा? संकष्टी नेमकी कधी आहे? गुऊवार रात्री बारा वाजता संपतो, मग बारा दहाला नॉनव्हेज खाल्ले तर चालते हे बरोबर आहे का? अमुक एका पॅलेंडरमध्ये होळी अमुक तारखेला आहे. पण दुसऱ्या पॅलेंडरमध्ये वेगळ्याच दिवशी आहे, हे कसे काय? दक्षिण भारतात वेगळे आणि उत्तर भारतात वेगळे असे सण का आहेत? त्यांच्या पंचांगात अमुक तारखेला अमुक तिथी आहे पण इकडे तरी वेगळेच दिसते? दोन तिथींच्या मधील तिथी गेली कुठे? तिथी गायब कशी होते? तिथी एक्स्ट्रा कशी येते?.......हुश्श्श! या आणि या सारख्या सगळ्या प्रश्नांना उत्तर एकच. पंचांग! तुम्हाला माहिती आहे का की, आपला प्रॉब्लेम कुठे झाला, ज्यांना पंचांग बघता येते त्यांनी ते इतरांना समजावून सांगण्याचे कष्ट घेतले नाहीत आणि ज्यांना पंचांग पाहता येत नाही त्यांनी ज्यांना पंचांग बघता येते त्यांना विचारायची तसदी घेतली नाही! आजही खेड्यातल्या लोकांमध्ये ‘पंचांगवाल्याकडे जाऊन येऊया’ सारखे शब्द प्रयोग ऐकायला मिळतात. म्हणजे जसा लोखंडवाला, कपाटवाला,  गॅरेजवाला  तसा  पंचांगवाला! आपल्या सगळ्यात मोठे दुर्दैव आहे की, आपल्या स्वत:च्या पद्धती अनुसार तयार केले गेलेले आणि ज्याचा इतिहास रामायण महाभारताच्या काळाच्याही पूर्वीचा आहे, अशा पॅलेंडरला किंवा एसएमएसला ज्याला पंचांग म्हणतो हे काही लोकांच्यामध्ये मर्यादित राहिले. जे ज्ञान प्रत्येकाला असायला हवे, याची माहिती प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला असायला हवी, लहानपणी जसे जानेवारी, फेब्रुवारी शिकवले जाते तसे चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ हे आपण शिकवायचे विसरलो आणि छापील कागदावर ज्यामध्ये मोजक्मया दोन-तीन गोष्टी सोडल्या तर काहीही बदलत नाही आणि त्यातील सगळ्याच गोष्टी या उधारीच्या आहेत अशा पॅलेंडरवर आपण 1752 पासून अवलंबून राहायला लागलो! आपल्या सनातन संस्कृतीत असलेल्या पंचांगांमध्ये जी माहिती आहे ती जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही पॅलेंडरवरती नाही हे अगदी छाती ठोकपणे मी सांगू शकतो. नावातच पंचांग आहे. म्हणजे पाच अंगे आहेत. म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. या सगळ्याच्या परमुटेशन कॉम्बिनेशनमधून तयार होणारा मुहूर्त, त्या मुहूर्तावर केले जाणारे काम, त्या कामाने मिळणारे यश आणि त्या यशाचा केलेला सण हे सगळे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत असे वाटत नाही का तुम्हाला? कदाचित म्हणूनच ज्योतिष आणि कर्मकांड हे एकमेकांशी आपल्या इथे घट्ट जोडून आहे. याला तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही नजरेने पाहू शकता. तुम्ही पॅलेंडर पाहिले आहे का असे विचारणे म्हणजे तुम्हाला लिहिता वाचता येते का असे विचारण्यासारखे असेल कदाचित. पण जे पॅलेंडर तुम्ही वापरता ते पॅलेंडर कोणी सुरू केले, कधी सुरू केले, त्याचा इतिहास काय, हे तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही मला विचाराल की, या सगळ्याचा इतिहास घेऊन करायचे काय? त्याच्यासाठी उत्तर म्हणजे ज्या वस्तू आपण वापरतो त्या वस्तूबद्दल निदान आपल्याला साधारण माहिती तरी असायला हवी. वर्ष अखेर जवळ येत चालली आहे, त्यामुळे बरेच लोक आता नवीन पॅलेंडर छापायच्या तयारीत असतील. या पॅलेंडरमध्ये जे दिवस आहेत, म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार इत्यादी, हे तरी कुठून आले त्याचा विचार केला आहे का? कित्येक बिनडोक सुधारणावादी किंवा नव अतिशिक्षित लोकांच्यामध्ये हे वार इजिप्शियन किंवा मायन संस्कृतीतून आले आहे. वाराबद्दल माहिती पुन्हा एकदा कधीतरी सांगेन. पण सध्याला सांगतो की, वारांची संकल्पना ही मूळ भारतातली आहे, ज्याप्रमाणे शून्याचा शोध (इथे शून्याचा शोध म्हणजे शून्य या संकल्पनेला चिन्हाचे स्वरूप देण्याचा शोध), गणित, सर्जरी, चिकित्सा विज्ञान इत्यादीचा सुवर्ण भारताने दिला. आपल्या सनातन संस्कृतीने दिला. त्याचप्रमाणे कालमापनाचे परिमाणसुद्धा भारतानेच दिलेले आहे. याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे गणिताला आपण वैदिक गणित म्हणतो आणि चिकित्सा शास्त्राला आयुर्वेद असे म्हणतो. आमच्या धर्मात विज्ञान आहे आणि विज्ञानात आमचा धर्म आहे!! यापेक्षा सौंदर्य दुसरे कुठले असू शकते?

Advertisement

मेष

समस्येचे निराकरण झाल्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल. फायदेशीर परिस्थिती निर्माण होत आहे. गरजूंना मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. काही दु:खद बातम्या मिळाल्याने मन विचलीत होऊ शकते. व्यवहाराशी संबंधित प्रकरणांमुळे मित्राशी संबंध बिघडू शकतात. कुटुंबातील काही सदस्यांसोबत वैयक्तिक वर्तुळ राखल्याने तुमच्याविऊद्ध गैरसमज होऊ शकतात.

Advertisement

उपाय : बत्तासे दान करा.

वृषभ 

व्यावसायिक कामे गुप्त ठेवा. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरे कोणीतरी घेऊ शकते. सहकाऱ्यांमध्ये राजकीय वातावरण असेल. यावेळी, कामाच्या ठिकाणी खूप सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांसह, खरेदी इत्यादीमध्ये तुम्ही आनंदी वेळ घालवाल. प्रेम संबंध अधिक घट्ट होतील. व्यावसायिकांना प्रभावशाली ग्राहकांसोबत काम करण्याची संधी मिळू शकते.

उपाय : मनगटावर 26 लिहा.

मिथुन

थकवा वाढेल. आराम मिळवण्यासाठी थोडा वेळ काढा. कुठेही व्यवहार करताना तुमचे बजेट लक्षात ठेवा. कोणतेही न्यायालयीन प्रकरण चालू असेल, तर अत्यंत विवेक आणि विवेकाने काम करण्याची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे योग्य नाही. कुटुंबातील कोणीतरी मदतीसाठी विचारू शकते. मुलांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो.

उपाय : लहान मुलींना आंबट-गोड मिठाई द्या.

कर्क

नात्यात गोडवा आणण्याची कला शिकावी लागेल. व्यवसायात जास्त कामे होतील. तऊणांनी निऊपयोगी कामात आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. ऑफिसमध्ये तुमच्या कामात लहानशा निष्काळजीपणामुळे तुम्ही तणावात राहू शकता. सजग आणि जागरूक रहा. बाहेरच्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.

उपाय : विहिरीत नाणे टाका.

सिंह

शुभवार्ता मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याच्या बाबतीत काही परिपक्वता आणणे आवश्यक आहे. कोणतीही जोखीम घेणे टाळा आणि वाहने इत्यादींचा काळजीपूर्वक वापर करा. दुखापतीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी होईल. जुन्या विश्वासू लोकांच्या बोलण्याला महत्त्व द्या आणि सल्ला घेऊनच काम करा.

उपाय : लोखंडी वस्तू दान द्या.

कन्या 

काही गोष्टींमध्ये भावनिकदृष्ट्या कमकुवत राहिल्याने नुकसान होऊ शकते. ज्या गोष्टींमुळे सध्या काही अडचणी येत आहेत त्या सुधारतील. महिलांना व्यवसायाशी संबंधित प्रस्ताव मिळू शकतात. तुमचा जोडीदार तुमच्यावर काही कामासाठी दबाव आणू शकतो, तुम्हाला संयम राखावा लागेल. आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या चिंतेचे कारण असू शकतात.

उपाय : मुंग्यांना साखर घाला.

तूळ

कोणतेही आव्हान आले तर घाबरू नका. त्यापेक्षा तुमच्या क्षमतेनुसार त्यावर उपाय शोधा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. महिला, त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे सुरळीतपणे पार पाडतील आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्र्रमदेखील करतील. जोखमीशी संबंधित कामात वेळ आणि पैसा वाया घालवू नका. स्पर्धेची तयारी करणाऱ्या लोकांना ऑफर मिळू शकते.

उपाय : तेल दान द्या.

वृश्चिक

नोकरीत काही अडचण आल्यास अधिकाऱ्याची मदत घेणे फायदेशीर ठरेल. तुमच्या प्रियजनांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. घरगुती कामात ऊची राहील आणि मनोरंजनाशी निगडीत योजनाही बनवल्याने आराम वाटेल. काही विशेष कामासाठी धोका पत्करणे फायदेशीर ठरेल. इतरांच्या बाबतीत जास्त हस्तक्षेप करणे टाळा. अन्यथा यामुळे तुमचेच काम विस्कळीत होईल.

उपाय : लाल कपडा दान द्यावा.

धनु

वादग्रस्त प्रकरणे रागावण्याऐवजी शांततेने सोडवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे. मीडियाशी संबंधित लोकांसाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण होत आहे. व्यवसायात कोणतेही काम सुरू करण्यासाठी वेळ फारसा अनुकूल नाही. तुमच्या इच्छेनुसार काम करण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील.

उपाय : काळ्या कुत्र्याला खायला घालावे.

मकर 

तुमच्या इच्छा पूर्ण करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवन आनंददायी असेल. मित्रांसोबत गेट-टूगेदर कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि परस्पर संवादामुळे सर्वांना आनंद मिळेल. अनेक लोक तुमची हिम्मत तोडण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या जीवनातील बदल तुमच्या स्वभावात आणि कामातही बदल घडवून आणतील. तूर्तास, स्वत:वर विश्वास ठेवा.

उपाय : खीर दान द्या.

कुंभ

घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. जोडीदाराच्या चिंतेमुळे किरकोळ वाद होण्याची शक्मयता आहे. जमीन आणि मालमत्तेतून लाभ होईल आणि वादात विजय मिळेल. शत्रूंवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. बांधकाम साहित्य, शेती उपकरणे आणि इतर उपकरणे व्यावसायिकांना फायदा होईल. नोकरीत काम करणाऱ्यांना सामान्य वेळ आहे, पण जीभेवर ताबा ठेवा.

उपाय : भिकाऱ्याला वडे दान द्या.

मीन

काळ अनुकूल आहे. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांसोबतचा तणाव दूर होईल. इच्छित कार्य करण्यात यशस्वी व्हाल. घराच्या सुधारणेच्या कामांवर खर्च होण्याची शक्मयता आहे. कोर्टाच्या कामात पक्ष मजबूत राहील. विरोधकांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. अडथळ्यांवर मात कराल आणि मित्रांच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतील.

उपाय : पक्ष्यांना दाणे घाला.

Advertisement
Tags :

.