महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आज पृथ्वीवरील सर्वात लहान दिवस तर रात्र मोठी !

01:25 PM Dec 22, 2023 IST | DHANANJAY SHETAKE
todays small day in earth
Advertisement

हिवाळ्यामध्ये दिवस लहान, तर रात्र मोठी असते. २२ डिसेंबर हा वर्षांतील सर्वात लहान दिवस राहणार आहे. या दिवशी सव्वा तेरा तासांची रात्र, पावणे अकरा तासांचा दिवस राहील, दिवस व रात्रीचा कालावधी कमी-अधिक होत असल्याचा अनुभव आपल्याला नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या २३.५ अंशांनी कललेला असल्याने हे घडते. २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य पूर्वेस असतो. २२ डिसेंबर या दिवशी सूर्य अधिकाधिक दक्षिणेकडे असतो.या वेळी उत्तर गोलार्धात दिनमान सर्वात लहान दिवस असतो. येथून पुढे सूर्य उत्तर बाजूस सरकत जातो, यालाच उत्तरायण म्हणतात. ही स्थिती २१ जूनला पूर्ण होते. हा दिवस आपल्या भागात सर्वात मोठा असतो. २२ डिसेंबर रोजी सूर्य नेमका पृथ्वीच्या मकर वृत्तावर असून अक्षवृत्तीय स्थितीनुसार उत्तर बाजूस दिनमान वाढत जाते. उत्तर ध्रुवावर ते सर्वाधिक असते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवशी दिवस व रात्र समान असतात. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिनमान वाढत जाते. यातील फरक मात्र मकर संक्रांतीला जाणवतो. २२ डिसेंबरची रात्र सर्वात मोठी असल्याने ग्रह ताऱ्यांच्या दर्शनाची उत्तम संधी असेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्वेकडे वर चंद्र आणि सर्वात मोठा गुरु ग्रह एकमेकांच्या जवळयेतो. याच वेळी दक्षिण आकाशात वरच्या बाजूला शनी ग्रह आणि पहाटे पूर्वेला शूक्र ग्रहाचे ठळक स्वरूपात दर्शन दिसते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#2023#22december#day#earth#night#sky#sun#tarunbharat#World
Next Article