ऑस्ट्रेलियाचे उट्टे काढण्याची आज भारताला संधी
वृत्तसंस्था/ ग्रोस आइलेट (सेंट लुसिया)
भारत आज सोमवारी येथे आपल्या अंतिम सुपर एट सामन्यात धक्का बसलेल्या आणि दबावाखाली असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. यावेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या टी-20 विश्वचषक मोहिमेची गाडी रुळावरून उतरविण्याचे ध्येय बाळगेल. भारताला आज सलग तिसरा विजय गटात अव्वल बनविण्याबरोबर उपांत्य फेरीत पाठवेल, तर अफगाणिस्तानकडून अनपेक्षितपणे झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता देखील धोक्यात येईल.अफगाणिस्तानविऊद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने ऑस्ट्रेलियाला आता सोमवारी रात्री होणाऱ्या बांगलादेशविऊद्धच्या रशिद खानच्या संघाच्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा करावी लागेल. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हृदयद्रावक पराभव पत्करावा लागलेल्या भारताला त्यांच्या बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांचे अकाली बाहेर पडणे निश्चितच आवडेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशविऊद्ध पाठोपाठ विजय मिळविताना भारताने सर्व विभागांत चांगली कामगिरी करून दाखविली आहे.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, अॅश्टन अगर, अॅडम झॅम्पा, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, नॅथन एलिस.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)