For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचे उट्टे काढण्याची आज भारताला संधी

06:55 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचे उट्टे काढण्याची आज भारताला संधी
Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रोस आइलेट (सेंट लुसिया)

Advertisement

भारत आज सोमवारी येथे आपल्या अंतिम सुपर एट सामन्यात धक्का बसलेल्या आणि दबावाखाली असलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. यावेळी भारत ऑस्ट्रेलियाच्या टी-20 विश्वचषक मोहिमेची गाडी रुळावरून उतरविण्याचे ध्येय बाळगेल. भारताला आज सलग तिसरा विजय गटात अव्वल बनविण्याबरोबर उपांत्य फेरीत पाठवेल, तर अफगाणिस्तानकडून अनपेक्षितपणे झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता देखील धोक्यात येईल.अफगाणिस्तानविऊद्ध पराभव स्वीकारावा लागल्याने ऑस्ट्रेलियाला आता सोमवारी रात्री होणाऱ्या बांगलादेशविऊद्धच्या रशिद खानच्या संघाच्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा करावी लागेल. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून हृदयद्रावक पराभव पत्करावा लागलेल्या भारताला त्यांच्या बलाढ्या प्रतिस्पर्ध्यांचे अकाली बाहेर पडणे निश्चितच आवडेल. अफगाणिस्तान आणि बांगलादेशविऊद्ध पाठोपाठ विजय मिळविताना भारताने सर्व विभागांत चांगली कामगिरी करून दाखविली आहे.

Today is India's chance to beat Australiaरोहित आणि विराट कोहली या दोघांनी अफगाणिस्तानविऊद्ध दमदार खेळी केली तसेच शिवम दुबेने महत्त्वपूर्ण खेळी करत टीकाकारांना उत्तर दिले. रिषभ पंत अनेकदा रिव्हर्स हिटवर बाद होत आहे आणि त्यात तो दुरुस्ती करू पाहील. या स्पर्धेतील भारतासाठी सर्वांत मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी आहे. तो आता आपल्या आक्रमक स्पेलला पूरक फलंदाजीही करू लागला आहे. दुसरीकडे, कुलदीप यादवला मॅच-विनिंग योगदान देण्यासाठी थोडा वेळ लागला असला, तरी मधल्या षटकांमध्ये भारत बळींसाठी त्याच्यावर अवलंबून असेल.डॅरेन सामी क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी ही या स्पर्धेतील फलंदाजीसाठी सर्वोत्तम खेळपट्टी ठरली आहे. परंतु दिवसभर खेळपट्टीला बसणार असलेला उन्हाचा तडाखा संथ गोलंदाजांना मदत करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी चिंताजनक परिस्थिती आहे. अफगाणिस्तानविऊद्ध त्यांच्या फलंदाजांचा फ्लॉप शो दिसला आणि 111 च्या स्ट्राईक रेटने सहा सामन्यांतून केवळ 88 धावा केलेल्या मार्शला भारताविऊद्ध चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. ऑफस्पिनर ग्लेन मॅक्सवेललाही त्याचा 8.58 धावा प्रति षटक हा इकोनॉमी रेट बदलावा लागेल. आज कोहली लेग-स्पिनर अॅडम झॅम्पाचा कसा सामना करतो हे पाहणे मनोरंजक ठरेल. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविऊद्ध मिचेल स्टार्कऐवजी आागरच्या रुपाने अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवला. पण भारताविऊद्ध त्यात बदल होऊ शकतो.

Advertisement

संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, अॅश्टन अगर, अॅडम झॅम्पा, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, नॅथन एलिस.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.