For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निलजीत आज जंगी कुस्त्यांचे मैदान

12:04 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
निलजीत आज जंगी कुस्त्यांचे मैदान
Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

निलजी येथे श्री ब्रह्मलिंग यात्रोत्सवानिमित्त गुरुवार दि. 18 रोजी दुपारी तीन वाजता श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थांच्यावतीने विराट कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगिरी विरुद्ध ऑल इंडिया चॅम्पियन मनीष कुमार हरियाणा यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शिवानंद द•ाr दर्गा तालीम बेळगाव विरुद्ध दिल्लीचा करणकुमार यांच्यात होणार आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. कीर्ती बेनके कंग्राळी खुर्द विरुद्ध पै. राम मोटरे कोल्हापूर यांच्यात होणार आहे. यासह पैलवान विक्रम शिनोळी विरुद्ध प्रतीक मेहतर, प्रेम कंग्राळी विरुद्ध समर्थ लाठे कोल्हापूर, पृथ्वी कंग्राळी विरुद्ध अक्षय चौगुले शाहुपुरी, प्रवीण निलजी विरुद्ध रुपेश पाटील कोल्हापूर, कार्तिक इंगळगी विरुद्ध सनी राशीवडे, गुत्ताप्पा दावणेरी विरुद्ध ओमकार राशिवडे, अजित कंग्राळी विरुद्ध सारंग राशीवडे यांच्यात लढती होणार आहेत. यासह 50 हून अधिक चटकदार कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत. तरी कुस्तीप्रेमी नागरिकांनी या कुस्ती आखाड्याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.